प्रारंभ वृत्तसेवा
बीड : आष्टातील तालुक्यातील बाळेवाडी येथे गांज्याची शेती असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांच्या टिमने त्याठिकाणी छापा मारुन साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त करुन संबंधित शेतकऱ्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
हनुमंत अर्जुन पठाडे (रा. बाळेवाडी ता. आष्टी) यांनी त्यांच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यानंतर पोलीसांनी त्याठिकाणी छापा मारला असता, 130 गांज्याचे झाडे मिळून आले. एकूण अंदाजे किंमत सात लाख 70,000 हजार रुपये आहे. कलम 20 गुंगीकारक औषधीद्रव आणि मनोव्यापार परिणाम पदार्थ अधिनियम 1985 अन्वये संबंधित शेतकऱ्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने केली.