प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या काही वर्षापासून गैरप्रकार होत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. त्यात मागे एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. यात येथील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांनी चक्क जुन्या आरटीओंच्या सह्या करुन एका जेसीबीचे बोगस कागदपत्र तयार केले होते. या प्रकरणी बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल व सय्यद शाकेर या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याची गंभीर दखल घेऊन परिवहन आयुक्त यांनी सुरेखा डेडवाल यांच्या निलंबनाचे आदेश आज (ता. ०४) काढले आहेत. तर दुसरीकडे एजंट सय्यद शाकेर हे माञ आरटीओ कार्यालय परिसरात खुलेआम फिरत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी त्यांचा जमिन झालेला नाही. त्यांच्यावर बीड ग्रामिण पोलीस कारवाई का करत नाहीत हे माञ समजत नाही. गैरकामात गुन्हा नोंद असलेले एजंट सय्यद शाकेर यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई होणे गरजेचै आहे. आरटीओ परिसरात अशा एजंटवर बंदी घातली तर गैरकामांना मोठा आळा बसेल. जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.