पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत शांतता बैठक
गेवराई : कोरोनाच्या दोन वर्षानंतर तरुणाई गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्यासाठी रस्त्यावर उतरली असून शासनाकडून मात्र गणेशोत्सव मोठ्या थाटात वाजत गाजत आनंदात साजरे करण्याचे आव्हान शासनाकडून करण्यात येत असताना मात्र पोलीस प्रशासनाने शांतता कमिटीत घेतलेल्या बैठकीत गणेशोत्सव शांतता आणि थाटात मोठ्या उत्साहात साजरे करा मात्र हे उत्सव करत असताना कुठेही या उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आव्हान पोलीस प्रशासना कडून करण्यात येत आसतांना पोलीसाकडून साजरा होत असलेल्या या उत्सवाला सहकार्य करण्यात येईल मात्र हे सर्व कायद्याच्या चौकटीत राहून करावे असे दि. 24 रोजी तहसील हॉलमध्ये घेण्यात आलेल्या शांतता बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन वर्षापासून कोरोना असल्यामुळे शासनाने सर्वच सण उत्सव साजरे करण्यावर बंदी घातली होती. यामुळे तरुणाई हिरमोड झाल्यासारखे तरुणाईत रोश निर्माण झाला होता. मात्र कोराना संपलेला असतानाच सरकार मद्ये ही बदल झाला आणि महाराष्ट्र शासनाने शिंदे सरकारने या वर्षी सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे आव्हान जनतेला केले असून सध्या गणेशोत्सव आणि दहीहंडीचे कार्यक्रम सर्वत्र साजरे होत असताना सध्या गणेश उत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाकडून गणेश उत्सव शांतते साजरे करण्यात यावे यासाठी शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.
गेवराई पोलिसाकडून तहसील मीटिंग हॉलमध्ये या शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर , उपविभागीय पो. अधिकारी स्वप्निल राठोड, तहसीलदार सचिन खाडे , महावितरणचे अभियंता कपूर, मुस्लिम समाजाचे मुफ्ती साहब, पोलीस निरीक्षक पेरगुलवार, स.पो.नि. संतोष जंजाळ व मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड आदिची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी सर्वच मान्यवरांनी विविध मनोगत व्यक्त करत असताना गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरे करण्याची आव्हान व त्याबाबत येणाऱ्या अडचणी याबाबत माहिती उपस्थितांना दिली. या बैठकीला मार्गदर्शन करताना जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले की गेल्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात यावा अशे आव्हान महाराष्ट्र शासनाकडून केले असताना पोलीस प्रशासनाकडूनही हा उत्सव साजरे करतांना सहकार्य केले जाईल त्यासाठी गणेश भक्तांनी व गणेश मंडळांनी विविध देखावे साजरे करून कोणता अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी तर गणेशोत्सवाच्या काळात पत्ते इतर जुगार व सक्तीची वसुली करू नये, जर केली तर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला पत्रकार सुभाष सुतार, सुशील टकले, सुभाष शिंदे, काझी अमान, सोमनाथ मोटे, डी एस बी चे आघाव विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शेवटी गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पेरगुलवार यांनी आभार व्यक्त केले.
◾डीजे वाजण्यास परवानगी परंतु ठराविक डेसिबल मध्ये
मिरवणुकी दरम्यान डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे परंतु शासनाने ठरवून दिलेल्या ठराविक डेसिबल मध्येच आवाज असावा याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल
– नंदकुमार ठाकूर
पोलीस अधीक्षक बीड
◾मिरवणुकी दरम्यान उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या मंडळास बक्षीस
विसर्जन मिरवणुकी वेळेस सामाजिक संदेश तथा उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या गणेश मंडळास महसूल प्रशासनाच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक देण्यात येतील
– सचिन खाडे
तहसीलदार, गेवराई
अवैध दारू विक्री विरोधात सक्त कारवाई करण्यात येईल
गणेशोत्सवाच्या काळात अवैध दारू विक्री करताना आढळून आल्यास विक्री करणारा व ज्या ठिकाणावरून दारू विकत घेतली असेल अशा अधिकृत दुकानदारा विरोधात सक्त कारवाई करण्यात येईल- स्वप्निल राठोडउपविभागीय पोलीस अधिकारी, गेवराई