संग्रहित छायाचिञ
जायकवाडी धरण ७३.९७% भरले
पाण्याची आवाक अशीच राहली तर गोदावरी नदीपाञात पुराचे पाणी सोडावे लागेल — प्रशासन
प्रारंभ वृत्तसेवा
बीड: मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाणारे जायकवाडी धरण चौथ्या वर्षी ‘फुल्ल’ होण्याच्या दिशेने आहे. धरण आज (ता. १८) ७३.९३ टक्के भरले आहे. धरणात अजून सुद्धा पाण्याची आवक सुरु आहे. पाण्याची आवक अशीच राहीली तर गोदावरी नदीपाञात पुराचे पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे गोदावरी नदीपाञ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.