एक कोटी विम्याच्या रक्कमेसाठी पत्नीचे दहा लाखाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढला
अपघाताचा बनावा केला पण पोलीसांनी उघडा पाडला
स्थानिक गुन्हे शाखेची चांगली कामगिरी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : आयुष्याचा काही भरोसा नसल्यामुळे जवळपास सर्वच जण विमा काढत व त्याचा फायदाही होतो. घरातील कर्ता गेला तर विम्याच्या रक्कमेचा त्यांच्या परिवारातील सदस्यांना मोठा फायदा होता. परंतू बीड मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यात एक कोटीच्या विम्याच्या रक्कमेसाठी चक्क पत्नीनेच दहा लाखाची रुपारी देऊन पतीचा काटा काढल्याचा प्रकार उघड झाला. मयतच्या पत्नीसह इतर चौघांनी मिळून हा प्रकार केल्याची माहिती रविवारी (ता. 12) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांची उपस्थिती होती.
बीड ग्रामीण हद्दीतील पिपरगव्हण शिवारातील म्हसोबा फाटा परिसरात शनिवारी (ता. 11) एक अज्ञात इसमाचे प्रेत मिळुन आले होती. याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ठिकाणी एक पोलीसांना विनानंबरची स्कुटी मिळाली होती. यानंतर मयताची ओळख पटल्यानंतर पोलीसांनी मयताचेे नांव मंचक गोविंद पवार (रा. बीड) असल्याचे समजले. प्रकरणी त्याची पत्नी व मुलगा यांचेकडे
चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यांचे वागणे बोलने हे संशयास्पद आढळुन आले. यामुळे पोलीसांचा संशय आला यानंतर संशयीत इसम नामे श्रीकृष्णा सखाराम बागलाने (वय 27 वर्षे रा. काकडहिरा ता.जि. बीड) यास ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदर चा गुन्हा मी व माझा सोबत इतर 3 जणांनी मिळून केला आहे. हे करण्यासाठी मयताची पत्नी गंगाबाई मंचक पवार यांनी आम्हाला दहा लाखाची रुपारी दिली होती. यातील दोन लाख रुपये आम्ही इसार म्हणून घेतले होते. शुक्रवारी (ता. 10) मी व इतर तीन जणांनी मिळून म्हसोबा फाटा परिसरात मंचक गोविंद पवार यास मारले. यानंतर अपघाताचा बनावा करण्यासाठी, त्यास रोडवर आणून त्याच्या जवळील स्कूटी गाडीस आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. मंचक मेल्याची खात्री केल्यानंतर आम्ही तेथून निघून गेलोत असे आरोपी बागलाने यांनी सांगितले. यावरुन श्रीकृष्ण सखाराम बागलाने (वय 27 वर्षे रा. काकडहिरा ता.जि. बीड), सोमेश्वर वैजिनाथ गव्हाणे (वय 47 वर्षे रा. पारगांव सिरस) (गंगाबाई भ्र. मंचक पवार (वय 37 वर्षे रा. वाला ता. रेणापुर जि. लातुर ह.मु. मिरगे रो हाऊस, अंकुशनगर बीड) यांच्यावर गुन्हा नोंद करत यांना ताब्यात घेतले असून यात अजून दोन जण फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. सुनिल कृष्णा लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड, श्री वाळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सतिष वाघ, पोउपनि श्री संजय तुपे, कैलास ठोंबरे, नशीर शेख, अभिमन्यु, सतिष कातखडे, अशोक दुबाले, गणेश हंगे, राहुल शिंदे, अश्विन सुरवसे, गणेश मराडे, संपत तांदळे, अतुल हराळे यांनी केली.