प्रारंभ न्युज
बीड : विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार विनायक मेटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, मिञपक्षाने माझ्यावर अन्याय केलाय, पण आम्ही त्यांच्या सोबतच राहणार असल्याचे मत आमदार विनायक मेटे यांनी रविवारी (ता. १२) प्रारंभशी बोलताने व्यक्त केले.
विधानपरिषदेचे आमदार म्हणून गेल्या २५ वर्षापासून आमदार विनायक मेटे सत्तेत किवा विरोधात राहीले आहेत. परंतु त्यांच्या विधानपरिषदेची मुदत संपत असुन दहा जागांसाठी निवडणूका होत आहेत. यात भाजपाच्या वतिने आ.विनायक मेटे यांना उमेदवारी देण्यात येणार होती. परंतु यात आ. विनायक मेटे यांना उमेदवारी नाकारण्यात आली, यामुळे आ. विनायक मेटे नाराज असल्याची चर्चाही सुरु होती. याच अनूषंगाने प्रारंभने त्याच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, मिञ पक्षाने आमच्यावर अन्याय केला, परंतु आम्ही त्याच्या सोबत असल्याचे मत आ.विनायक मेटे यांनी व्यक्त केले.