बीड : जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून रोज खुन, मारामाऱ्या, दरोड्यांच्या घटना घडत आहेत. तरीही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक काहीच करत नाहीत. पुष्पा-डॉन गँगची मस्ती वाढली असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या नाकावर टिच्चुन कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवल्याचे मत आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदे मध्ये व्यक्त केले.
बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालय येथे सोमवारी (ता. 29) आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, तालुकाअध्यक्ष नवनाथ प्रभाळे, खालेक पेंटर, राहुल मस्के यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी झालेल्या गोळीबाराचा आमदार विनायक मेटे यांची चांगला समाचार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच जर अशा घटना वाढल्या तर हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत आ. मेटे यांनी व्यक्त केले. यासह त्यांनी यावेळी विविध विषयांवर मत व्यक्त करत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.