शहरातील वकील बांधवांशी साधला संवाद
बीड प्रतिनिधी : शहराचा विकास आणि दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी तसेच शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले मोलाचे सहकार्य आवश्यक असल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांनी शहरातील वकील बांधवांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी शहरातील वकील बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी वकील बांधवांनी केलेल्या सूचनांचा शहर विकास आराखड्यात समावेश करण्यात येईल असे आश्वासन देताच वकील बांधवांनी तुतारीलाच पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच महानंद डेअरी उपाध्यक्ष रामकृष्ण बांगर यांनी ही बैठक घेतली आहे.
बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने गुरुवारी (दि.२७) बीड जिल्हा वकील संघाची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये सहभागी होत आ. संदीप क्षीरसागर यांनी वकील बांधवांशी शहराचा विकास, नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि आगामी काळात शहरात सकारात्मक परिवर्तन घडविण्याबाबत सविस्तर संवाद साधला. यावेळी वकील बांधवांनी आपल्या काही सूचना आणि शहराच्या विकासाविषयी संकल्पना मांडल्या यासर्व सूचनांचा नक्कीच आम्ही विचार करु आणि शहराच्या विकास आराखड्यात याचा समावेश करु अशी ग्वाही दिली. तसेच कायद्याच्या क्षेत्रातील जाणते, सजग आणि समाजाभिमुख वकील बांधवांचे मार्गदर्शन आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले. तुमचे मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्यासाठी खूप आवश्यक असून, तुम्ही आशीर्वाद दिले तर त्या जोरावर शहराचे उज्ज्वल भविष्य घडवणार अशी ग्वाही दिली. तसेच येत्या २ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), समाजवादी पार्टी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे आणि सर्व २६ प्रभागातील ५२ नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या तुतारी आणि मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी कराण्याचे आवाहन केले. यावेळी वकील बांधवांनी आमची शक्ती तुमच्याच पाठीशी असल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांना आश्वस्त केले. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीड जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.रघुराज देशमुख, ॲड.सचिव सुभाष काळे, ग्रंथपाल सय्यद अजीज, जेष्ठ विधिज्ञ ॲड.डी.बी.बागल, ॲड.प्रशांत राजापूरकर, ॲड.बाळासाहेब बाहेगव्हाणकर, ॲड.बाळासाहेब कोल्हे यांच्यासह बीड जिल्हा वकील संघाचे वकील बांधव उपस्थित होते.
चौकट (महत्वाचे)
सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या उपस्थितीत बैठक
बीड नगरपरिषद निवडणूक-2025 च्या अनुषंगाने बीड शहरातील नागरिकांची आ.संदीप क्षीरसागर, सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी नागरिकांशी आ.क्षीरसागर आणि रामकृष्ण बांगर यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे आणि सर्व नगरसेवक निवडून देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे उपस्थित होते.

















