बेरजेचं राजकारण ; जिल्ह्यातील दिग्गजांची बांधली मोट:माजी मंत्री बदामराव पंडित, माधवराव निर्मळांचा प्रवेश तर बाळराजे पवार व केशवराव आंधळेंची ताईंच्या नेतृत्वावर निष्ठा
कार्यकर्त्यांना ‘थॅंक यू’ म्हणत व्यक्त केली कृतज्ञता तर ‘हटायचं नाही आता जिंकायचचं’ म्हणत चेतवले स्फुल्लिंग
परळी वैजनाथ :
मला आता पक्षाची सत्ता आणायची आहे. आपण कोणतेही नियम न तोडता काम करायचे आहे, मात्र समोरच्यांनी जर नियम तोडले तर आपण कसे गप्प बसायचे नाही, म्हणून आम्ही देखील निर्णय घेत आहोत, अनेक अपक्षांना आता आपण पक्षात घेत आहोत. बदामराव पंडित,माधव निर्मळ यांना पक्षात घेतले आहे आणि आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. आता युती होईल की नाही ते पक्ष ठरवेल. मात्र आम्ही काम करणार आहोत. त्यामुळेच ही सोन्यासारखी माणसं मी निवडले आहेत, असं प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे केलं.
दीपावली हा सण प्रत्येकाचे जीवन प्रकाशमान करणारा सण आहे असाच आपला निर्धार असुन बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करायचा आहे. हा कार्यक्रम नवा विचार व प्रेरणा निर्माण करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक अराजकीय नाही तर राजकीय स्वरूपाचा आपण आयोजित केला. आज पर्यंतच्या सुखदुःखाच्या सर्व वाटचालीत तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलात, सत्ता असो अथवा नसो माझ्या नेतृत्वाची गरीमा कायम ठेवली याबद्दल सर्वांना थँक्यू म्हणण्यासाठी आजचा कार्यक्रम असल्याचे सांगत पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञ भावना व्यक्त केली. त्याचबरोबर आता मागे हटायचे नाही तर जिंकायचेच असा ठाम विश्वास व्यक्त करत येणाऱ्या जि.प., पं. स. व न.प निवडणुका ताकदीने लढवून जिंकून दाखवा असे आवाहन करत पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवले.
बीड जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार केशवराव आंधळे, माधवराव निर्मळ, गेवराईचे बाळराजे पवार आदींसह भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे प्रमुख आदी उपस्थित होते.
विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा
————–
दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात ना. पंकजाताई मुंडे यांनी संघर्ष, निष्ठा, सामाजिक सौहार्द आणि विकास यांचा मिलाफ घडवणारे धडाकेबाज भाषण करून कार्यकर्त्यांना नव्या जोमाने प्रेरित केले. आपल्याला बीड जिल्ह्यात सर्वदूर व सर्वांगीण विकास करायचा आहे. आपण कधीच विकासात जात,धर्म, पंथ व मतांचे गणित हे पाहिलेले नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचे संस्कार व विचार यावरून कधीही ढळलेलो नाही.आज पर्यंतच्या सुखदुःखाच्या सर्व वाटचालीत तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलात, सत्ता असो अथवा नसो माझ्या नेतृत्वाची गरीमा कायम ठेवली. त्यामुळे आपली कामाची गती थांबणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
_मुंडे साहेबांचा विचार, संस्कार व विश्वास निभावला!_
———————
मुंडे साहेबांनी मला आमदार केलं. एक डझन आमदारांना ‘माझी लेक भारी’ असं ते म्हणाले होते.त्यांचा विचार, संस्कार व विश्वास निभावला तो सार्थ करण्यासाठी आयुष्यभर काम करणार आहे. मुंडे साहेबांच्या पश्चात लाखो लोकांनी मला जपलं, माझ्यावर डोळस विश्वास दाखवला.पद असो वा नसो, माझी गरिमा राखली.आपण जातीवर आधारित राजकारण कधीच केलं नाही. चुकीचं समर्थन केलं नाही.माझ्या कार्यकर्त्यांकडूनही चुक होवू नये असेच प्रयत्न केले. चुकीला कधीच थारा दिला नाही. तसेच राजकारणातील यश- अपयशाबद्दल मला कोणाचा राग आलेला नाही. पण माझ्या लोकसभेतील हरण्याने काही लोकांनी मरण पत्करले हे जिव्हारी लागलेलं आहे.त्यामुळे आता मरायचं पण हरायचं नाही असा आपला ठाम निर्धार आहे. सत्ता सर्वांचे हित करण्यासाठी असते मी तेच करत राहणार असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
_आता पारितोषिकाचा काळ!_
——————–
राजकारणातील संघर्षाचा काळ मी आणि तुम्ही अनुभवला आहे. खूप परीक्षा दिल्या, पण आता पारितोषिक मिळालं आहे. आजपर्यंतची आपण पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पाळलेली आहे. कोणी काहीही म्हणो परंतु आपली वाटचाल ही सकारात्मक, सत्य व प्रामाणिकच राहणार आहे.अनैतिक काही केलं नाही,कधी करणारही नाही. लोकांच्या हिताच्या आड कोणी येऊ नये याची मात्र निश्चित काळजी घेणार असा विश्वास ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.
माझे काम समाजातील सर्व घटकांसाठी
——————
आपण सगळे मिळून समाजात सौहार्द निर्माण करू, पण चुकीचं होत असेल तर समर्थन करणार नाही. कधी कधी आपल्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढले जातात आणि तेच समोरच्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने दाखवून गैरसमज व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता सर्वांना सोबत घेऊन सामाजिक सौहार्दा साठी आपण पुढाकार घेणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आपण कधीच टीकाटिप्पणी केलेली नाही. ते राजकारणातही नाहीत. त्यामुळे एखाद्या समाजाला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु त्यांना काही लोक चुकीचे अर्थ दाखवून प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करतात.गुलामीचं गॅझेट,गुलामाची औलाद असं आपण कधीच म्हटलेलं नाही. तसेच जालन्याच्या पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणांना भेटी देणे ही आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आपण धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते, त्याचबरोबर बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना भेटलो व कायद्याच्या चौकटीत जे शक्य असेल ते प्रामाणिकपणे करण्याचा शब्द आपण सरकारच्या वतीने त्यांना दिला. संविधानाने दिलेल्या हक्कानुसार व कायद्यानुसार प्रत्येक अन्याय झालेल्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही मुंडे साहेबांची भूमिका होती तीच आपली ही भूमिका आहे. ती सातत्याने मांडली आहे. त्यामुळे एखाद्या समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे हे आपले संस्कार नाहीत. त्यामुळे मनोज जारंगे पाटील यांना सुद्धा मी दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करते असेही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले.
_कार्यकर्त्यांना दिला ‘कर्मयोगाचा’ मंत्र_
येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये आपण पक्ष म्हणून ताकतीने निवडणुका लढवणार आहोत. महायुती असल्याने युती बाबतचा निर्णय जो होईल त्या अनुषंगाने या निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत. मात्र जिंकायचेच हा निर्धार मात्र प्रत्येकाने केला पाहिजे. कार्यकर्ता मारून कोणताही पक्ष राजकारण करत नसतो. त्यामुळे सर्वांना न्याय देण्याची भूमिका निश्चित असेल. अनेक जण आज आपल्या सोबत आले आहेत, येणार आहेत. सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला जिंकायचे आहे. त्या दृष्टीने कामाला लागा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. तसेच पुढच्या वर्षीच्या दिपावली स्नेहमिलनात जिल्हा परिषद अध्यक्ष, पाच-सहा सभापती, सहा नगराध्यक्ष, तीस-पस्तीस जि.प. सदस्य, अशा रांगा लावा असं सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.
बेरजेचं राजकारण ; बदामराव पंडित, माधव निर्मळ भाजपात
दरम्यान, आजच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात पंकजाताई मुंडे यांनी बेरजेचे राजकारण करत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जिल्ह्यातील दिग्गजांची मोट बांधल्याचे दिसून आले. यावेळी गेवराईचे माजी मंत्री बदामराव पंडित, माजलगांवचे नेते माधवराव निर्मळ यांचा भाजपात जाहीर प्रवेश झाला तर भाजपमध्येच असणारे पण मधल्या काळात दुरावलेल्या गेवराईचे बाळराजे पवार व माजी आमदार केशवराव आंधळे यांनी ताईंच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त करत जोमाने कामाला लागण्याचा संकल्प व्यक्त केला.
पंकजाताई जिल्हयाच्या समृध्दीचा महामार्ग – डाॅ प्रीतमताई
आपल्या सर्वाच्या लाडक्या नेत्या पंकजाताई मंत्री झाल्या, हिच खरी आपली दिवाळी आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज दोन नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्हा बळकट करायचा असेल तर ताईचे हात बळकट करा असं सांगत डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी पंकजाताई ह्या जिल्ह्याच्या समृध्दीचा महामार्ग असल्याचे यावेळी म्हटले. कार्यक्रमाचे संचलन भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.