सर्वसामान्य घरातील नगराध्यक्ष निवडून आणणार अनिलदादा जगताप
बीड, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब, मराठवाडा संपर्क मंत्री ना. संजयजी शिरसाट साहेब व मराठवाडा संपर्क नेते अर्जुन खोतकर साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन साहेब आणि जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची काल दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी बीड शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जालना रोड येथे महत्त्वपूर्ण रणनीती बैठक पार पडली असून या बैठकीत शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन साहेब आणि जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांनी प्रभाग निहाय उमेदवार कसे असावेत?, प्रचार कसा करावा?, जनसंपर्क अभियान आणि स्थानिक स्तरावरील रणनीतीवर सखोल मार्गदर्शन करून शिवसैनिकांशी मुक्त संवाद साधला. या बैठकीस मोठ्या संख्येने इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी शिवसेना पक्षाचे इच्छुक उमेदवार म्हणून रीतसर अर्ज भरून दिले. तसेच भावी नगराध्यक्ष पदासाठी बीडमधून तीन सक्षम उमेदवारांची प्राथमिक स्वरूपाची मुलाखत देखील घेण्यात आली. तसेच आम्हाला योग्य युतीमध्ये सन्मान मिळाला तर आम्ही महायुतीसोबत राहू अन्यथा नगर पालिका निवडणुक आम्ही स्वबळावर लढवू. प्रत्येक प्रभागात आमच्याकडे इच्छुक असणारे सक्षम उमेदवार आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडे प्रियंका आकाश वाडमारे, मंदाबाई मारुती जाधव आणि शितल प्रतिक कांबळे या इच्छुक उमेदवारंची नावे समोर आली आहेत. असे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या बैठकीस जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर, चंद्रकांत नवले, युवसेना जिल्हाप्रमुख रविराज बडे यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवासेना व सर्व अंगीकृत संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक उपस्थित होते.
—–
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून तीन प्रमुख उमेदवार!
बीड नगरपरिषद व नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मुख्य रणनीती बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी शिवसेना नगराध्यक्ष पदासाठी प्रियंका आकाश वाघमारे मंदाबाई मारुती जाधव आणि शितल प्रतिक कांबळे असे तीन उमेदवार इच्छुक असल्याची माहिती दिली. तसेच यावेळी सर्व सामान्य घरातला नगराध्यक्ष निवडून आणणार असल्याचा ठाम विश्वास अनिलदादा जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
—–
बीड नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार- अशोक पटवर्धन
शिवसेना नगर पालिका निवडूकिसाठी पूर्णतः सज्ज असून यंदा सर्व सामान्य घरातील नगराध्यक्ष निवडून आणुन बीड नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असा ठाम विश्वास शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन साहेब आणि जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांनी व्यक्त केला.
°°°°°















