शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार विक्रम काळेंना शिक्षकांची ना पसंती
ह्या निवडणूकीत मराठवाड्यातील शिक्षक कोणाला संधी देणार
आमदार काळे वर मराठवाड्यातील शिक्षकांचा प्रचंड रोष
प्रचार दौऱ्यात काळेंना शिक्षकांकडून ना पसंती
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या 18 वर्षापासून मराठवाडा शिक्षक मतदार संघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून विक्रम काळे यांना शिक्षकांनी निवडून दिले. परंतु आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत फक्त स्वतःचाच विकास केला. यामुळे मराठवाडा शिक्षक मतदार संघ 2023 ची ही निवडणूक आमदार विक्रम काळे साठी जड जाण्याचे चित्र निर्माण झाले असून त्यांना प्रचारादरम्यान शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सत्तेत असताना सुद्धा शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी एक शब्द सुद्धा न काढणारे आमदार विक्रम काळे कोणत्या तोंडाने मतदान मागतायेत हाच प्रश्न मराठवाड्यात उपस्थित होऊ लागला आहे.
महाराष्ट्रातील इतर विभागापैकी मराठवाडा हा विभाग विकासापासून दूर असून येथील शिक्षकांच्या अनेक अडचणी आहेत. वारंवार मराठवाड्यातील शिक्षकांनी आमदार विक्रम काळे यांना त्यांच्या अडचणीचे घराणे प्रत्येक वेळेस सांगितले आहे, निवेदने सुद्धा दिलेली आहैत, उपोषणे सुद्धा केले आहेत यासह लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आलेले आहेत. परंतु आजपर्यंत शिक्षकांच्या पदरात निराशाच पडली आहे. शिक्षकांचे आज सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित असून विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह इतर महत्त्वाचे प्रश्न येथील शिक्षकांना भेडसावत आहेत. परंतु या सर्व प्रश्नाकडे आमदार विक्रम काळे यांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मराठवाडा शिक्षक मतदार संघातून 2023 ची निवडणूक आमदार विक्रम काळे लढवत असून त्यांना या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसणार आहे. याचे कारणही तसेच आहे येथील शिक्षकांनी सलग तीन वेळा त्यांना आमदार म्हणून पाठवले होते परंतु त्यांना कशासाठी शिक्षकांनी निवडून दिले याचाच विसर आमदार विक्रम काळे यांना पडल्याचे दिसते. सध्या प्रचार सुरू असून आमदार विक्रम काळे यांना विविध शिक्षकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी जड झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यातील शिक्षक काळेंवर प्रचंड नाराज
बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी आमदार विक्रम काळे यांना नेहमीच भरभरून मतदान केलेले आहे. बीड येथील शिक्षकांच्या मतदानावरच ते आजपर्यंत चांगल्या मतदानाने निवडून आलेले आहेत. परंतु निवडून आल्यानंतर फक्त निवडणुकीत तोंड दाखवणारे अशी विक्रम काळे यांची ओळख निर्माण झाली आहे . यामुळेच बीड जिल्ह्यातील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या प्रचंड नाराज असून त्यांची नाराजगी मतदानातून दिसणार आहे.