समाजकंटाला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा.. संदीप होटकर
भाविक भक्तांनी सकाळी 10 वाजता रस्ता रोकोस उपस्थित राहावे.
बीड( प्रतिनिधी)बीड दिनांक 30 डिसेंबर रोजी बीड शहरातील मोमीनपुरा तें खासबाग जोडणाऱ्या पुलाजवळ बऱ्याच वर्षांपासून निळकंठेश्वर मंदिर असून या मंदिरात भावकी भक्त मोनोभावे पूजाअर्चना करतात.
या मंदिरात अज्ञात समाजकंटकानी मंदिर परिसरात नासधूस करून मंदिरावरील भोंगे काढून टाकले होते.
मंदिराचे कुलुप तोडून आत मधीलDVR लंपास केला. c.c.t. v. कॅमेरा आहेत परंतु त्यातील dvr लंपास केल्याने नासधूस करणारे दिसून आले नाही.
बार्शी नाका येतील भाविक भक्त यांनी पेठ बीड पोलीस,जिल्हा अधीकारी कार्यालय,पोलीस उपाधिक्षक वाळके साहेब यांना भेटून समाजकंटकाला अटक करावी म्हणून निवेदन कारवाई करावी अशी मागणी केली होती परंतु समाजकंटकास अटक नं केल्याने 16 जानेवारी रोजी सकाळी बार्शी नाका चौकात निषेध करण्यासाठी सकाळी 10 वाजता भाविक भक्त रस्ता रोको करणार आहेत.
घटना स्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम यांनी येऊन मंदिर व परिसरात पाहणी केली होती परंतु पंधरा दिवस झाले तरी समाजकंटकाला अटक केली नसल्याने रस्ता रोको करणार आहेत. या समाजकंटाला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. यावेळी बार्शी नाका येथील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंदिराचे अद्यक्ष संदीप होटकर यांनी केले आहे.