Pune : फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप क्रे. सोसायटी पुणे वतीने सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा प्रतिष्टेचा सहकार गौरव पुरस्कार २०२२ बीड येथील श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली बीडला प्रदान करण्यात आला.फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप क्रे. सोसायटी पुणे वतीने १३ जानेवारी २०२३ रोजी प्रशिक्षण व पुरस्कार वितरण सोहळा पुष्पक रिसॉर्ट शिर्डी येथे मा. ना. सुरेशजी प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार, मा. विजयकुमार साहेब केंद्रीय निबंधक भारत सरकार, मा.खा. हेमंत पाटील साहेब, मा.खा. धनंजय महाडिक साहेब, सतिष मराठे, अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशरावजी वाबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.मान्यवरांच्या हस्ते श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटला सहकार गौरव पुरस्कार २०२२ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटच्या वतीने यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब, संचालक श्रीराम सूर्यभान बोबडे, पांढरे विजयकुमार, कसबे ऋषिकेश, लोळगे प्रथमेश आदी उपस्थित होते. संस्थेची व्यवसायवृद्धी,सहकार चळवळीसाठी योगदान व संस्थेचे सामाजिक कार्य इ. निकषावर महाराष्ट्रात सहकार चळवळीत दिशादर्शक व दीपस्तंभासारखे काम करणाऱ्या संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. श्री साईराम अर्बन मल्टिस्टेट अल्पकाळात २०० कोटीच्या ठेवींचा टप्पा पार करत असून संस्थेच्या एकूण पाच जिल्ह्यात २२ शाखाद्वारे कामकाज सुरु आहे. मल्टीस्टेट व पतसंस्था चळवळीच्या महाराष्ट्राच्या कार्यात संस्थेचे अध्यक्ष शाहिनाथ विक्रमराव परभणे हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेला नऊ वर्षात १३ पुरस्कार मिळाले आहेत आणि म्हणूनच श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट या संस्थेने आदर्श संस्था म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे. मिळालेल्या या पुरस्कारामुळे संस्थेचे खातेदार, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी व हितचिंतक या सर्वाची मान उंचावली असून संस्थेचे अध्यक्ष शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.