बीड : राज्य राखीव पोलीस बल गट १ पुणे येथील सहायक समादेशक सादिक अली नुसरत अली सय्यद यांची समादेशक (पोलीस अधीक्षक) पदावर पदोन्नती झाली असुन ते राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १९ अहमदनगर येथे कार्यभार स्विकारणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात ते १९८४ साली रूजू झाले. त्यांचे सेवाकालावधीत त्यांनी अमरावती, पुणे शहर, पुणे ग्रामीण, लोहमार्ग पुणे, मुंबई शहर पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा व राज्य राखीव पोलीस बल गट १ व २ पुणे येथे त्यांच्या सेवाकालावधीत उत्तम कामगिरी केलेली आहे तसेच विविध सामाजिक व पर्यावरण पुरक उपक्रम राबविलेले आहेत.
श्री. सय्यद यांना मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे उल्लेखनिय सेवेबददल सन २०१७ साली सन्मानचिन्ह देऊन गौरवविण्यात आले आहे. तसेच सन २०२० मध्ये त्यांना उल्लेखनिय सेवेबदल, त्यांनी आपले कर्तव्य सचोटी, प्रमाणिकपणे व अत्यंत जबाबदारीने पार पाडल्याने त्यांच्या सेवाभिलेखाचा विचार करून प्रशंसनिय कार्यासाठी भारत सरकार यांचे मा. राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
सादिक श्री सय्यद हे बीड जिल्हायातील मुळचे आष्टीचे रहिवासी आहेत. सेवा कालावधीत त्यांनी कौशल्यपूर्ण कामगिरी व कठोर परीश्रम केल्यामुळे त्यांना समादेशक या पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांना समादेशक पदावर पदोन्नती मिळाल्याने समाजातील सर्वच स्तरातील मान्यवरांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. समादेशक गट १९ अहमदनगर या पदोन्नती ठिकाणी ते समादेशक पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.