बीड- बलात्कारी ब्राम्हण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून तमाम ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आणि दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या दैनिक लोकाशा चे संपादक विजयराज बंब आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ब्राम्हण समाजाने केली आहे.जिल्हाधिकारी यांना निवेदन देत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना हे निवेदन ब्राम्हण समाज बांधवांनी दिले.या वृत्तपत्राचे आर एन आय रजिस्ट्रेशन रद्द करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबत तातडीने कायदेशीर कारवाई न झाल्यास प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि विधिमंडळासमोर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा समाजाने दिला आहे.
बीड येथून प्रकाशित होणाऱ्या लोकाशा या वृत्तपत्राने 19 ऑगस्ट 2022 रोजी क्रॉस लाईन या सदरात बलात्कारी ब्राम्हण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.ज्यामध्ये ब्राम्हण समाजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे.समाजाची बदनामी करण्याच्या हेतूनेच हे लिखाण करण्यात आले आहे.
हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा या वृत्तमागे हेतू आहे.अतिशय चारित्र्य संपन्न आणि वेदपुराण जाणणारा म्हणून ब्राम्हण समाजाकडे पाहिले जाते.मात्र लोकाशा मधील वृत्तामुळे समाजाची मोठी बदनामी झाली आहे.याबाबत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ व इतर सर्व संघटना,समाज बांधव यांनी एकत्रित येत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.
याबाबत समाजात प्रचंड असंतोष असून या वृत्तपत्राचे संपादक व इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी एड समीर पाटोदकर,चंद्रकांत जोशी,दिलीप खिस्ती,मुकुंद कुलकर्णी, विकास उमापूरकर, सागर देशपांडे, प्रमोद ठोसर,लक्ष्मीकांत रुईकर, अजिंक्य पांडव,अभय पटवारी,एड विलास जोशी,बाळकृष्ण जोशी,कृष्णा वांगीकर,संजय डोळे,अजिंक्य मुळे,आर के पांडव,गणेश बेहरे,दीपक सर्वज्ञ , अनिकेत देशपांडे,राजेश कुलकर्णी, नितेशकुमार कुलकर्णी,व्ही पी जोशी,गजानन जोशी,धनंजय कुलकर्णी केज ,बंटी सेलमोहकर यांची उपस्थिती होती.