Beed : देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या घटनेला ७५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वतंत्राचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतानाच बीड-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गापासुन ३ किलोमीटर अंतरावरील बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील मौजे.सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्तिवरील लक्ष्मण परसराम शिंदे यांना रस्त्याच्या अडचणीमुळे वेळेवर औषधोपचार न झाल्यामुळे मृत्यु झाला तर त्यांच्या अंत्यविधीसाठी आलेले जामखेड येथील नगरसेवक डिगांबर चव्हाण व त्यांचे ४-५ साथीदार तराफ्यावरून प्रवास करत असताना पाण्यात पडले सुदैवाने वेळीच त्यांना वाचवण्यात आले अन्यथा अनर्थ घडला असता.
रस्ता नसल्यामुळेच वेळेवर उपचारा अभावी ६ दिवसापुर्वी चुलते वारले तर १५ वर्षापुर्वी पत्नी वारली:- बाळासाहेब शिंदे ग्रामस्थ
__
दि.०८ ऑगस्ट गेल्या आठवडय़ात आमचे चुलते लक्ष्मण परसराम शिंदे हे आजारी होते दवाखान्यात जाण्यासाठी तलावाच्या काठावर आले परंतु होडग्या अलीकडच्या तिरावर असल्यामुळेच त्यांना तिथेच २ तास ताठकळत बसावे लागले त्यातच वेळेवर उपचाराअभावी त्यांचा मृत्यु झाला. तर अंत्यविधीसाठी आलेले जामखेड येथील नगरसेवक व त्यांचे सहकारी पाण्यात पडले,१५ वर्षापुर्वी माझ्या पत्नीचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यु झाला होता. पाण्यात पडण्याच्या घटना तर वारंवार घडत आहेत.
देश मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना रसत्याअभावी आरोग्य तसेच शिक्षण ,दुधदुभते आदिसाठी जीव धोक्यात घालून थर्माकोलवरून तर तराफ्यावरून प्रवास करावा लागतो.वारंवार निवेदन आंदोलनानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही गेल्यावर्षी १५ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रामस्थांनी तलावात जलसमाधी आंदोलन केले होते,तेव्हा लिखित आश्वासन देऊन सुद्धा कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर १५ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याबद्दल निवेदन प्रशासनाला दिले आहे