–2019 विधानसभा निवडणूकीच्या शपथपत्रातुन माहिती उघडकीस
–माहिती लपवल्या प्रकरणी गुन्हा नोंद होणार का?
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळेस ना. धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र निवडणूक विभागाकडे दाखल केले होते. त्यात त्यांनी करुणा शर्मा व त्यांच्या पासून असलेल्या दोन अपत्यांची माहिती लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियमानुसार सर्व माहिती ही निवडणूक विभागाला देणं बंधंन कारक असते परंतु ना. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मापासून असलेल्या दोन अपत्यांची माहिती लपवली आहे. मंत्री बच्चु कडू यांनी शपथपत्रात एका घराची माहिती लपवली होती, यामुळे त्यांना दोन महिन्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती. आता मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा माहिती लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का? अशा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
उमेदवार सर्व सामान्य असो की, पक्षाचा त्या उमेदवारला निवडणूक विभागाकडे त्यांची संपुर्ण माहिती देणं बंधंन कारक असते. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणूकीत ना. धनंजय मुंडे यांनी मोठी माहिती लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी दिलेल्या शपथपत्रा माहिती देताना करुणा शर्मा पासून असलेल्या दोन अपत्यांची माहिती दिली नाही. नियमानुसार जो उमेदवार शपथपत्रा माहिती लपवेल त्या उमेदवारावर कारवाई होत असते, परंतु ना. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होणार का? त्यांच्यावर गुन्हा नोंद होणार का? किंवा काहीच होणार नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच ना. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा व त्यांच्या पासून असलेल्या अपत्यांची माहिती त्यांनी दिली होती, या मुलांचा सांभाळ मि करत आहेत ही माहिती सुद्धा त्यांनी दिली होती. मग त्यांनी हिच माहिती शपथपत्रात का दिली नाही अशा सुद्धा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
ना. धनंजय मुंडे यांच्यावर तीन ठिकाणी 420 चे गुन्हे
2019 च्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीत त्यांच्यावर नऊ गुन्हे नोंद असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यात 420 चे गुन्हे तीन पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पोलीस स्टेशन बर्दापुर ता. अंबाजोगाई कलम 420, 468, 465, 464, 471 सह 32 भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन बर्दापुर ता. अंबाजोगाई येथे 465, 468, 471, 419, 420 सह कलम 43 भा.द.वी नुसार गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन परळी येथे कलम 188 भा.द.वी नुसार गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन परळी येथे कलम 420, 406, 409, 418 सह 34 भा.द.वी कलम 3 महाराष्ट्र ठेवीदाराचे संरक्षण कायदा तसेच कलम 13 (1) (क) (ड) व 13 (2) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा नोंद यासह इतर 7 ठिकाणी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे ना. मुंडे यांच्यावर नोंद आहेत. शपथपत्रात धनंजय मुंडे यांच्यावर 9 गुन्हे नोंद असून ते प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी 2019 च्या शपथपत्रात दिली होती.