प्रारंभ वृत्तसेवा
बीड : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभदिनी प्रारंभची सुरुवात करण्यात आली होती. 19 फेब्रुवारी 2022 ला प्रारंभचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. प्रथम वर्धापनदिनानिमित्त प्रारंभ परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. गेल्या वर्षाभरात प्रारंभने केलेल्या प्रामाणिक कामाची पावती प्रथम वर्धापनदिनी प्रारंभ टीमला मिळाली. एका वर्षात प्रारंभ टीमने जिल्ह्यातील विविध महत्वांच्या विषयांना हात घालून ते प्रश्न जनतेसमोर आणण्याचे काम केले. यासह युवकांना प्रेरणा मिळावी, यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या विशेष मुलाखती घेतल्या, त्याला सुद्धा वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला. शनिवारी संपन्न झालेल्या प्रथम वर्धापनदिनी प्रारंभ परिवारला हजारो हातांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या.
19 फेब्रुवारी 2021 ला सायं.दैनिक प्रारंभची सुरुवात करण्यात आली होती. बीड जिल्ह्यात दैनिकांची संख्या जास्त प्रमाणात असून सुद्धा आम्ही आमचे एक वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी ठरलो आहोत. आमच्या यशात सर्वच वाचकांचा मोलाचा वाटा आहे. आम्ही प्रामाणिक काम करत गेलोत व जिल्ह्यातील वाचकांनी आम्हाला भरभरुन प्रतिसाद दिल्यामुळे आज आम्ही प्रथम वर्धापनदिन साजरा करु शकलोत. यापुढेही आम्हाला तुमचे आशिर्वाद व शुभेच्छा मिळतील असचे काम आम्ही करत राहूत. येणाऱ्या वर्षात आम्हाला काय नविन करता येईल यासाठी आम्ही सर्व जण सदैव प्रयत्नशील राहूत. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रथम वर्धापनदिनी आपण उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा रुपी आशिर्वाद दिल्यामुळे आमचे बळ अजून वाढले असून आम्ही तुमच्या प्रेमामुळे खुप भारावून गेले आहोत. आपण आमच्या टाकलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रारंभ टीम सदैव तत्पर असेल व जिल्ह्यातील महत्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे काम करणे गरजेचे आहे ते सर्व आम्ही करण्यास सदैव तत्पर आहोत. भविष्यात सुद्धा आम्हाला तुमचे प्रेम असेच हवे आहे. आपण प्रारंभच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त उपस्थित राहीलात, त्याबद्दल प्रारंभ टीमच्या वतिने आपले मन:पुर्वक खुप खुप खुप धन्यवाद.