नदीपात्रात सहा दिवसापुर्वी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या कुटूंबाची आ.मेटेंनी घेतली भेट
फक्त भेट न देता या परिवारातील इतर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली
बीड : गेवराई तालुक्यातील शहाजानपुर चकला येथील चार मुलांचा गेल्या सहा दिवसापुर्वी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मुत्यू झाला होता. या कुटूंबाची रविवार,दि.13 फेब्रुवारी रोजी आ. विनायकराव मेटे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी या परिवारातील इतर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे. यावेळी बोलताना आ. विनायकराव मेटे म्हणाले की, या चार जणांचा बळी काही नेते व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसेच बीड जिल्ह्याला सामाजिक न्यायमंत्री पद मिळाले असून ज्या दलित कुटूंबातील अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्या परिवाराला मदत करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांना इतर कामातुन वेळ मिळत नसल्याचे मत आ. विनायकराव मेटे यांनी यावेळी व्यक्त केले.
वाळू माफियावरच नव्हे तर महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनातील मोठ्या लॉबीवर कारवाई होणे अपेक्षित होते.परंतु नेहमीसारखे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे.जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते महसूल व पोलिस प्रशासनातील लोकांचे स्वतःचे ट्रक ट्रॅक्टर व हायवा असल्याने वाळू माफिया सोबत वाळू उपसा धंद्यासाठी प्रशासनातील या लोकांकडून जोरदार मदत होत असल्याचा आरोप आ. मेटे यांनी यावेळी केला.भ्रष्ट राजकीय नेते व प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून थातूरमातूर कारवाई प्रशासन मोकळे झाले आहे.असा आरोप आ.मेटे यांनी केला आहे.
वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात गेल्या सहा दिवसापुर्वी खेळण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मुत्यू झाला होता.रविवारी आ. विनायकराव मेटे यांनी या कुटूंबाची भेट घेत या कुटूंबाला मदतीचा हात दिला. कुटूंबातील इतर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आ. विनायकराव मेटे यांनी स्विकारली. यासह तुम्हाला अजून काही मदत लागली तर सांगा अशा शब्द सुद्धा आ. विनायकराव मेटे यांनी या कुटूंबाला दिला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. विनायकराव मेटे म्हणाले की, या चार अल्पवयीन मुलांचा बळी हा काही नेते व प्रशासनाने घेतला आहे. यासह जे गुन्हे नोंद केले आहे ते फक्त थातुरमातूर केले असल्याचे मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले.
एवढी मोठी घटना होऊन सुद्धा सामाजिक न्यायमंत्र्यांना वेळ मिळेना – आ.मेटे
गेवराई तालुक्यातील शहाजानपुर चकला येथे गेल्या सहा दिवसापुर्वी चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सामाजिक न्याय मंत्र्यांनी किमान जिल्ह्यातील ही गंभीर घटना पाहून भेट देणे आवश्यक होते परंतु त्यांना अजूनही वेळ मिळेना.दलित समाजातील ऊसतोड गोरगरीब बांधवांना अशा वेळी आधार देणे गरजेचे असताना.आतापर्यंत या ठिकाणी येऊन कुणीच आधार दिलेला नाही ही बाब लांछनादस्पद आहे
सामाजिक न्यायमंत्री यांना अजून सुद्धा या परिवाराला भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या परिवाराला भेट देऊन या कुटूंबाला प्रत्येकी 10 -10 लाखाची मदत देण्याची गरज आहे. परंतु त्यांना इतर कामातुन वेळ मिळत नसल्याचे मत आ. विनायकराव मेटे यांनी यावेळी व्यक्त केले.