प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्हा तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखा जातो, याठिकाणी पाऊस कमी पडतो म्हणून येथील शेतकरी नेहमीच चिंताग्रस्त असतो. परंतु गेल्या चार पाच दिवसापासून जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प भरले आहेत. त्यात बीड शहराला पाणी पुरवठा करणारे धरण म्हणजे माजलगाव व बिंदुसरा धरण हे दोन्हीही धरण आज भरले आहेत. यासह जिल्ह्यात सुद्धा चांगला पाऊस सुरु असल्यामुळे यंदा जिल्हाकरांना पाण्याची समस्या उदभवणार नाही. यासह पिक घेण्यासाठी सुद्धा येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. तसेच बीड शहरातुन वाहणाऱ्या बिंदुसरा नदी पात्र जवळ राहणाऱ्यांना नागरीकांना सतर्क राहण्याचा इशारा नगर पालिकेने दिला आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून निसर्गाचा समतोल दिसत नाही. परंतु गेल्या वर्षापासून जिल्ह्यात पाऊस चांगल्या प्रकारे पडत आहे. गेल्या वर्षा जिल्ह्यातील महत्वांचे प्रकल्प व इतर प्रकल्प भरल्यामुळे जिल्ह्याला पाणी समस्याचा सामना करावा लागला नव्हता. यंदा सुद्धा सुरुवातीला चांगला पाऊस पडला होता, नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे यंदा पाणी साठ्याची समस्या निर्माणच होती. त्यात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात पाणी साठा जमा झाला आहे. त्यात आज माजलगावचे व बिंदुसरा प्रकल्प भरल्यामुळे तर बीड शहरासह मालजगाव परिसरातील गावांचा तसेच जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची पाणी समस्या मिटली आहे. यंदा येथील शेतकऱ्यांना चांगले प्रकारे पिके घेता येणार असून पाण्याची समस्या सुद्धा जाणवणार नाही. जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल ही संपुर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यामुळे जिल्ह्यात जर पाऊस चांगला असेल तर येथील छोटे मोठे धंदे चांगल्या प्रकारे चलतात. यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस असल्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठा व नागरीकांना दिलासा मिळणार आहे.
बीड शहरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा
बीड शहरापासून जवळ असणारे बिंदुसरा धरण 100% भरले असल्यामुळे व अजून सुद्धा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे कोणत्याही क्षणी बिंदुसरा नदीला पुर येऊ शकतो. यामुळे शहरातुन वाहणाऱ्या बिंदुसरा नदी पात्र परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी सतर्क राहण्याच्या सुचना नगर पालिकेच्या वतिने देण्यात येत आहेत.