भाजपा नेते संभाजी सुर्वे यांनी केली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
बीड (प्रतिनिधि): सध्या जिल्हाभर रेमडिसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे म्हणून रूग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्हा रुग्णालयातून निष्काळजी पणाने व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संबधित आसलेल्या बाहेर खाजगी रूग्णालयात पुरविण्यात येणारा साठा या मुळे आज रेमडीसिविर साठी गरजू रुग्णांना आज भटकंती करावी लागत आहे म्हणूनच या प्रकरणाची एक समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा नेते संभाजी सुर्वे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.
याबाबत सविस्तर असे की बीड जिल्हा रुग्णालयात जे रेमडिसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत ते बाहेरील खाजगी कोरोना रुग्णालयात सुध्दा मागणी प्रमाणे दिले जातात परंतू ते इंजेक्शन खरच त्या संबंधित रुग्ना पर्यंत जातात का? आणि कोणत्या रुग्णालयात किती इंजेक्शन आज पर्यंत देण्यात आली याची रितसर माहिती जिल्हा रुग्णालयाकडे ठेवलेली आहे का? कारण ज्या रुग्णालयात पाहिले सीएस गित्ते काम करायचे त्या रुग्णालयातच का इंजेक्शन जास्त दिले बाकी कडे रुग्ण नव्हते का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दीप हॉस्पिटल मधीलच एका एका दिवशी ५० रेमडिसिवर ची आवश्यकता असलेले पत्र का येतात खरच त्या रुग्णालयात येवढ्या रुग्णांना इंजेक्शन दिले का? आणि आत्ता पर्यंत ज्या रुग्णांना इंजेक्शन शासकिय जिल्हा रुग्णालयातून रेमडिसिविर देण्यात आली ते त्यांच्या पर्यंत पोहोच झाले का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत म्हणूनच जिल्हाधिकारी यांनी या बाबीची एक समिती नेमून सखोल चौकशी करावी नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नेते संभाजी सुर्वे यांनी निवेदना द्वारे दिला आहे.