गेवराई : राजकारण हा शेतकर्यांच्या पोरांसाठी सोप्पा विषय नाही, पण मी तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर ही हिंम्मत केली आहे. गेवराई मतदारसंघातील 62 वर्षापासूनची घराणेशाही आपल्याला संपवायची आहे. मला शेतकर्यांचा आवाज बनायचे आहे. यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला फक्त एकदा साथ द्या, मी तुमचा भ्रमनिरास करणार नाही, अशी आर्त हाक पुजा मोरे यांनी ग्रामस्थांना दिली. त्या गेवराई मतदारसंघातील वेगवेगळ्या गावात प्रचारादरम्यान बोलत होत्या.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरे यांनी मंगळवारी शृंगारवाडी, धर्मेवाडी, शहापूर तांडा, शहापूर, खेर्डा खु., एकदरा, तेलगाव (बु.), पुंगणी, डुब्बा (मजरा), इरला, जायकोचीवाडी, जदीद जवळा, फुलपिंपळगाव, सावरगाव, मंगरूळ 1, मंगरूळ 2, सावरगाव आदी गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आपली भूमिका पटवून दिली.
मनोजदादा जरांगे पाटील आणि माजी भुमिका सारखीच आहे. पण ही भुमिका सभागृहात मांडण्यासाठी आपल्या हक्काचा आवाज तिथे असणे गरजेचे आहे. मी ज्या दिवशी विधानसभेत जाईल त्या दिवशी तुम्हाला अभिमान वाटेल असेच काम करून दाखवेल. तुम्ही मला मतदानरूपी आशीर्वाद द्या, मी तुमचा भ्रमनिरास होऊ देणार नाही, असे वचन तुम्हाला देते, असेही पुजा मोरे म्हणाल्या.
चौकट –
गावकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद –
पूजा मोरे यांनी ज्या गावांचा दौरा केला, त्या प्रत्येक गावात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपलीच लेक लढत असल्याची भावना गावकर्यांमध्ये असून, आपला हक्काचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत असेल तर त्याला आपण सहकार्य केले पाहिजे अशी भावना ग्रामस्थांमध्ये दिसून आली. पुजा मोरे यांनी मुलगी असतानाही आपल्या साठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. प्रसंगी पोलीसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. जेलमध्ये देखील जावून आली. मतदारसंघाला इतकं खंबीर, आणि कणखर नेतृत्व मिळत असेल तर आपण पुजा मोरे यांच्या पाठीशी उभं राहीलं पाहीजे अशी प्रत्येक गावातील ग्रामस्थ बोलून दाखवत होते.
चौकट –
खेर्डा गावात बांधावर जाऊन महिलांशी संवाद –
पूजा मोरे या ग्रामीण भागात वाढलेल्या आहेत. त्यांना शेतकरी आणि ग्रामस्थांच्या समस्या यांची अत्यंत जवळून अशी जाण आहे. दौर्या दरम्यान त्या खेर्डा गावात थेट बांधावर गेल्या आणि तिथे काम करीत असणार्या महिलांशी संवाद साधला. आपल्यातलाच कोणीतरी आपल्याला इतक्या आत्मीयतेने बोलत आहे, आपल्या अडचणी समजावून घेत आहे, याचा आनंद यावेळी महिलांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. पूजा मोरे यांनीही मी तुमचीच लेक आहे, या लेकीच्या हाताला बळ द्या असे भावनिक आवाहन केले आणि याला महिलांनी अत्यंत उत्साहात प्रतिसाद दिला.