अजितदादांनी 30 कोटींचे मौलाना आझाद महामंडळ 700 कोटींवर नेले – आ.इद्रिस नायकवडी
परळीत आ.इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा
परळी – अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर दोन पक्षांसोबत सत्तेत गेला म्हणून आपल्या समाजाची दिशाभूल केली जात आहे. मुळात अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्याची धमक आणि काम करण्याचा नेक इरादा हा अजितदादा पवारांमध्ये आहे हे विरोधकांना सुद्धा माहित आहे. म्हणूनच मागच्या अर्थसंकल्पात मोलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे बजेट तीस कोटींवरून वाढवून अजितदादांनी 700 कोटींवर नेऊन दाखवले हे सत्य समाजाला समजले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य आ.इद्रिस नायकवडी यांनी परळी येथील मेळाव्यात बोलताना व्यक्त केले आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहरातील व्हीआयपी फंक्शन हॉल येथे आ.इद्रिस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्यांक समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास परळी शहरासह तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार तसेच धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असताना विशाल गडाच्या घटनेपासून ते मीरा भाईंदरच्या घटनेपर्यंत दादांच्या कामाची तत्परता आम्ही पाहिली आहे अल्पसंख्यांक समाजासाठी कायम धावून येण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे लोकसभेत काय घडले याचा विचार न करता आता विधानसभा निवडणुकीत मात्र समाज बांधवांनी संपूर्णपणे धनंजय मुंडे सारख्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे असेही श्री नाईकवाडी पुढे बोलताना म्हणाले.
आदरणीय अजित दादा व धनंजय मुंडे साहेब यांच्या पुढाकारातूनच पार्टीच्या धरतीवर मार्टि साकारले, मराठी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील गरीब कुटुंबातील अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या मुलांना प्रचंड मोठा लाभ होणार आहे या प्रकारचे निर्णय व्हायचे असतील तर आपल्याला कायमस्वरूपी धनंजय मुंडे आणि अजित दादा पवार यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल असाही निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
समाजाच्या विकासासाठी विविध ठिकाणी शादीखाने, तसेच रस्ते, पाणी यांसारख्या विविध योजना आणि घरकुलांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी नेहमीच समाजासाठी प्राधान्याने काम केलेले आहे. आगामी काळात शहरांमध्ये एक भव्य शादीखाना व महिलांसाठी स्वतंत्र हॉल उभारणे त्याचबरोबर शहरातील चारही कब्रस्तानांचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी चार प्रार्थना हॉल उभारण्याचा संकल्प धनंजय मुंडे यांनी केला असून आगामी काळात तेही कामे पूर्ण केली जातील, असा विश्वास यावेळी प्रास्ताविकपर भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, अयुब भाई पठाण, शकील कुरेशी, अजित कच्छी, राजा खान, जाफर खान, तकी खान, अन्वर मिस्कीन, इस्माईल पटेल, सुरेश आण्णा टाक, शरद भाऊ मुंडे, हाजी बाबा, अल्ताफ पठाण, एजाज शेख, शेख नाझीर हुसेन, सेवादल चे लाला पठाण, के डी उपाडे, दत्ताभाऊ सावंत, सय्यद सिराज आसिफ अली, सिराज अहमद, गफार काकर, जमील अध्यक्ष, शकील कच्छी यांसह अनेक मान्यवर पदाधिकारी आदी उपस्थित होते.