आज जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
अंबाजोगाई तालुक्याची चिंता वाढली, बीड तालुक्याला काही प्रमाणात
दिलासा
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित केले असले तरीही मात्र कोरोना लॉकडाऊन होण्याचे नाव घेत नाही. आज जिल्ह्यात तब्बल 434 नव्या रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात आढळून आले तर बीड तालुक्याला यात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशीच आकडेवारी वाढत गेली तर बीड जिल्ह्यात रुग्णांना बेडसुद्धा उपलब्ध होणार नाहीत. यामुळे नागरिकांनी यापुढे दक्ष राहून कोरोनाला कसे हरवला येईल यासाठी जिल्हाप्रशासनाने दिलेल्या कोवीड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
आरोग्य विभागाकडून दुपारी प्राप्त झालेल्या 2959 अहवालापैकी 2525 अहवाल निगेटिव्ह आले तर 434 अहवाल पॉझीटिव्ह आहे. यात अंबाजोगाई-112, आष्टी-63, बीड-95, धारूर-4, गेवराई-13, केज-22, माजलगाव-30, परळी-54, पाटोदा-23, शिरूर-12, वडवणी-6 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले.