उबाठा सेनेतील ऍड.संगीता चव्हाण, रविराज बडे, गजानन कदम यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!
बीड, प्रतिनिधी – शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील उबाठा सेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्य ऍड.संगीता चव्हाण तसेच बीड जिल्ह्याचे युवासेना जिल्हाप्रमुख गजानन कदम, युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऍड. रविराज बडे आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ऐतिहासिक प्रवेश सोहळा आहे. बीड जिल्ह्यातून तब्बल दोन हजार महिला भगिनी आणि युवक बारा तासांचा प्रवास करून मुंबईला शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आले आहेत ही बाब पक्षाला ऊर्जा देणारी आहे अशी भावना महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी पक्ष प्रवेश सोहळ्या दरम्यान व्यक्त केली.
काल दि. 12 ऑगस्ट रोजी हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन तथा महाराष्ट्रा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न खा. डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृवाखाली सुरु असलेल्या शिवसेनेच्या दमदार अशा कार्यपद्धतीस प्रभावित होऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेतील महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्य ऍड. संगीता चव्हाण व सर्व महिला पदाधिकारी, युवासेना जिल्हाप्रमुख ऍड. रवीराज बडे, गजानन कदम आणि त्यांच्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांनी वर्षा निवास्थान मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन भैय्या मुळूक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याकरिता बीड जिल्ह्यामधून चारशे गाड्यांचा ताफा मुंबई येथे डेरे दाखल झाला होता. मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शिंदे साहेब म्हणाले की, अनिल जगताप यांनी काही महिन्यापूर्वी पहिल्यांदा बीडमधून पाचशे ते सहाशे गाड्यांचा ताफा मुंबईत आणून रात्री दीड वाजता आपला स्वतःचा शिवसेनेत ऐतिहासिक प्रवेश केला तर आता जगताप, मुळूक यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली बीडमधून मुंबईत दुसऱ्यांदा चारशे गाड्यांचा ताफा रात्री दोन वाजता येऊन शिवसेनेत ऐतिहासिक प्रवेश करत आहे याचे मला कौतुक वाटते. राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे. गेल्या दोन वर्षात घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी घेतला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला अधिक मजबूत करावे अशी अपेक्षा त्यांनी बीड जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक आणि सर्व शिवसैनिकांकडून यावेळी व्यक्त केली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना उपनेत्या सौ.कलाताई शिंदे तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—–
*चौकट*
*बीड शिवसेनेतल्या इनकमिंगमुळे अनिलदादा जगताप यांच्या विधानसभा दावेदारीला बळकटी*
बीड मतदार संघात विधानसभेसाठी यंदा अनिलदादा जगताप यांना मतदारांकडून प्रबळ उमेदवार मानन्यात येत आहे व त्या पद्धतीने अनिलदादा यांचे बीड मतदार संघावर प्रबल्य असल्याचे देखील जाणवत आहे. अनिलदादा जगताप सध्या विधानसभेसाठी कार्यकर्ते आणि मतदारांची बांधणी करत जोरदार तयारीला लागले आहेत. दिवसेंदिवस अनिलदादा यांच्या गोठात बीड मतदार संघातील निष्ठावंत आणि तळमळीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत कार्यकर्त्यांची वाढत असलेली इनकमिंग अनिलदादा जगताप यांच्या विधानसभा दावेदारीला बळकटी देऊन जात आहे.
यांनी केला शिवसेनेत प्रवेश
उबाठा सेनेतील ऍड.संगीता चव्हाण, रविराज बडे, गजानन कदम यांच्यासह अमोल जाधव, सचिन जाधव, कृष्णा सायलो, संकोड (सरपंच), संतोष भाऊ ललवाणी माजलगाव, रमेश सावंत माजलगाव, दिपकचंद्र शेनोरे, दिपक कदम, शैलेश कासार, जगदीश वखरे, अक्षय घल्लाळ, ओम आगलावे, प्रवीण लांडगे, यश लांडगे, सचिन उडान, अमन भालेकर, नाना शिंदे, गणेश उडान, मेघनाथ काळे, आदित्य जाधव, स्वयम् पवार, अभी तीठे, जयदत्त किरकत, राजेंद्र सानवटे, रामेश्वर किरकट,परशुराम कुटे, विशाल डोंगर, बिभीषण केसकर, अशोक सोनवणे ,राजेभाऊ कराड, संदिप नखाते, शेख फरजाना – उपजिल्हा संघटक, बीउ, इंद्रजीत पांचाळ, गौरव राठोड, बाळसाहेब चव्हाण जमुना साखरे – विधानसभा समन्वयक परळी, काझी रुझद – शहर संघटीका, मनोरमा डोईफोडे -उपजिल्हासंघटक, कविता घोरपडे – विधानसभा समन्वयक, बीड, कावेरी घुले – तालुका संघटक, सुनिता जाधव – शहर संघटक, प्रमील भोसले – लालुका संघटक परळी, योगीता चिंचकर-सहरसंघटक मजलगाव, धोंडीराम बाळू जाधव,
बाबासाहेब राठोड, सुभाष जाधव, उत्तम जाधव, अनुसया पवार, यमुनाबाई राठोड, सोजरबाई चव्हाण,
राज पाटील -उपतालुकाप्रमुख शिरूर यांनी व त्यांच्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
°°°°°