खा. प्रितमताई मुंडे यांचे मतदारांना आवाहन, चनई जिल्हा परिषद गटात झंझावती प्रचार दौरा
अंबाजोगाई ।महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना त्यांच्या विकासाची गॅरंटी आपण सर्वांनी बघितली आहे. त्यांच्या काळात सुरु झालेली विकासाची प्रक्रिया पुढे निरंतर सुरु ठेवण्यासाठी आणि विकासाच्या नवी उंची गाठण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना मत दया’ असे आवाहन खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी मतदारांना केले.
भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा.प्रितमताई मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील चनई जिल्हा परिषद गटात झंझावती दौरा केला. चनई, उमराई, धावडी, केंद्रेवाडी, लाडेवडगाव येथील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. आपल्या बीड जिल्ह्याच वैशिष्ट्य आहे, जिल्ह्यातील मतदार नेहमी विकासाला प्राधान्य देतात. हा आपल्या लोकांचा दृष्टिकोन आहे, लोकांचा हा दृष्टिकोन कायम राहावा ही आपली जवाबदारी असल्याचे खा.मुंडे म्हणाल्या.
बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत पाठवन ही आपली गरज आहे. पुढील पिढ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आपलं एक मत बीड जिल्ह्याच्या विकासाला, सुबकतेला, सुसंस्कृतपणाला, सामाजिक सलोख्याला आणि बीड जिल्ह्याच्या सुजलाम सुफलामतेच्या धोरणाला म्हणून पंकजाताई मुंडे यांना द्या,निश्चित आपल्या विश्वासाला सार्थ ठरवून बीड जिल्ह्याच्या विकासाची नवी उंची आपण गाठू अस त्या म्हणाल्या. दरम्यान केजच्या आ. नमिता मुंदडा, बालासाहेब दौडतले, नारायणराव केंद्रे, शंकर उबाळे, हिंदुलाल काकडे,कमलाकर कोपले, सतीश केंद्रे, दीपक शिंदे, सचिन शेप, सचिन फड, महेश शेप, राहुल राख यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
*विरोधकांचा अपप्रचार आणि बुद्धिभेद हाणून पाडा*
आपल्या उमेदवार सर्वसमावेशक आणि लोकांच्या अपेक्षांना पूर्ण करण्याची क्षमता ठेवणाऱ्या आहेत. जिल्ह्यात कुठेही आजूबाजूला नजर फिरवली तर राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते झालेले दिसतील. जलयुक्त शिवार योजनेतून बीड जिल्ह्यात पाणी पातळी वाढवण्याच कार्य पंकजाताईंनी केले आहे. विरोधकांकडे आपल्या उमेदवाराविरुद्ध बोलण्यासाठी काहीही नसल्यामुळे सामान्य मतदारांमध्ये अपप्रचार करणे, बुद्धिभेद करणे’ असे प्रकार विरोधकांकडून केले जात आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना पंकजाताईंनी आपल्या जिल्ह्याचा मागासलेपणा खोडून काढण्यासाठी अभूतपूर्व विकास निधी आणला, विकास कामे करताना, निधी देताना त्यांनी कधीही भेदभाव आणि द्वेष केला नाही,त्यांचे राजकीय भवितव्य जसे उज्वल आहे, तसेच बीड जिल्ह्याचे भवितव्य उज्वल करण्यासाठी सर्वांनी पंकजाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. आपल्या बीड जिल्ह्याचा मतदार सुज्ञ आहे, विकासाची कास ओळखून मतदार पंकजाताईंना ऐतिहासिक मताधिक्याने लोकसभेत पाठवून विरोधकांचा बुद्धीभेद आणि अपप्रचाराला हानून पाडेल असा असे खा. प्रितमताई म्हणाल्या.