विद्युत बिघाडामुळे पाणी पुरवठा अनिश्चित कालावधीसाठी लांबणार: महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे दुष्काळात तेरावा
बीड प्रतिनिधी – बीड शहरास करण्यात येणारा पाणी पुरवठा उशिराने होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले असून विद्युत बिघाडामुळे पाणी पुरवठा अनिश्चित कालावधीसाठी लांबणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बीड शहरवासियांना दुष्काळात तेरावा महिन्याचा अनुभव येऊ लागला आहे.
मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, काडीवडगाव पंप स्टेशनकरीता 132 के.व्ही. तेलगाव येथून 33 के.व्ही. विद्युत वाहिनी टाकण्यात आलेली आहे. सदरील वाहिनी अंदाजे 32 कि.मी. आहे. या विद्युत वाहिनीचा विद्युत पुरवठा दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजता पाऊस, वारा व विजा यामुळे परडी मोटेगाव शिवारात सिमेंट पोल तुटुन व तारा तुटल्याने खंडीत झाला. याबाबत महावितरण अभियंता यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी दुरुस्तीकरुन दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी दुपारी 03:00 वाजता विद्युत पुरवठा सुरु केला. यामध्ये एकूण 46 तास विद्युत पुरवठा नसल्याने शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नाही. काडीवडगाव येथे दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी रात्री 10:50 वाजता मोठ्या प्रमाणावर वादळ, पाऊस व विजा यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला यामध्ये 02 पोल पडले तसेच तिन ठिकाणी 33 के.व्ही. लाईनवर झाडे पडले. महावितरण मार्फत दुरुस्ती करुन पुन्हा पंपींग स्टेशन दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी रात्री 02:00 वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. यासाठी एकूण 51:30 तास विद्युत पुरवठा नसल्याने शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नाही. इट फिल्टर येथे 220 के.व्ही. बीड ते जवळा सबस्टेशन येथून विज पुरवठा केला जातो दिनांंक 17एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजता खंडेश्वरी मंदार पूर्व बाजूस सदरील लाईनचे 07 पोल वादळाने पडले. यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला. दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 06:30 वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाला. यासाठी एकुण 24:30 तास विद्युत पुरवठा नसल्याने शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नाही. इट फिल्टर येथे 220 के.व्ही. बीड ते जवळा सबस्टेशन येथून विज पुरवठा केला जातो दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 04:00 वाजता उमरी शिवार येथील नागापुर फाटा जवळ विद्युत वाहिनीवरील इन्सुलेटर तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला. दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी रात्री 10:30 वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाला. तसेच दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:00 ते रात्री 11:00 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत झाला. यासाठी एकुण 09:30 तास विद्युत पुरवठा नसल्याने शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नाही. काडीवडगाव येथे दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी रात्री 10:10 वाजता मोठ्या प्रमाणावर वादळ, पाऊस व विजा यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला. महावितरण मार्फत दुरुस्तीचे काम सुरू असून सकाळी 6:00 वाजल्यापासून सुरू असून अद्यापही विज पुरवठा सुरळीत झाला नाही. म्हणून दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी विद्युत पुरवठा नसल्याने शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नाही. यामध्ये एकूण 89:30 तास विद्युत पुरवठा नसल्याने शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नाही. जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत पाणी पुरवठा सुरू करता येणार नाही 2004-05 युआयडीएसएसएमटी या योजनेअंतर्गत काडीवडगाव येथे 33 केव्ही, एक्सप्रेस फिडर व इट (पिंपळगाव मांजरा) 33 केव्ही एक्सप्रेस फीडर बसविण्यात आले होते. परंतू पात्रूड, लऊळ, माजलगाव व पिंपळनेर येथे बीड पाणी पुरवठा योजनेच्या एक्सप्रेस फीडर मधून विद्युत पुरवठा महावितरण मार्फत वळविण्यात आला. त्यामुळे बीड शहर पाणी पुरवठा योजनेला एक्सप्रेस मधुन विद्युत पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. वरील ठिकाणी खंडीत विद्युत पुरवठा दुरूस्त करण्यास महावितरण मार्फत विलंब होत आहे. काडीवडगाव व ईट फिल्टर येथील विद्युत प्रवाह चालू होईल तेव्हाच शहरास पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल. वारंवार येणाऱ्या नैसगिक आपत्तीमुळे व महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विद्युत पुरवठामध्ये तांत्रिक बिघाडामुळे बीड शहराचा पाणी पुरवठा बेमुदत लांबणीवर जात आहे. ठाम भुमिका पाणी पुरवठा विभाग बीड ला घेता येईना म्हणून बीड शहरातील नागरीकांना नगर परिषद बीड कडून नम्रतेचे आवाहन आहे की, पाणी पुरवठ्यामुळे बीड शहरातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मुख्याधिकारी निता अंधारे दिलगारी व्यक्त करीत असुन पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुचना देऊन मदत करत आहेत. तरी बीड शहरातील जनतेने पाणी पुरवठा विभाग नगर परिषद बीड यांना सहकार्य करावे असे नम्न आवाहन मुख्याधिकारी नीता अंधारे नगर परिषद बीड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.