बीड : 39 बीड लोकसभा मतदार संघात उद्या (रविवारी) सायक्लोथॉन होणार असून मतदार संघाच्या जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह बीड चे नागरिक मतदान जागृती कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
39 बीड लोकसभा मतदार संघात येणाऱ्या बीड 230 केज232, माजलगाव229, आष्टी 231, परळी233 गेवराई 228 या सहा विधानसभा मतदारसंघातही उद्या मतदान जागृतीसाठी सायक्लोथॉन आयोजित केले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून स्वीप अंतर्गत सायकलिंग आयोजन करण्यात आले आहे.
सायक्लोथॉन ची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून होणार आहे.
सामाजिक न्याय भवन पासूनसुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अन्ना भाऊसाठे चौक ते सुभाष रोड ते हिरालाल चौक ते बलभीम चौक ते बशीर गंज ते सिव्हिल हॉस्पिटल ते माने कॉप्लेक्स ते नाट्यगृह ते नगर नका ते भगवान बाबा चौक ते जिजामाता चौक ते डॉक्टर लाईन मार्गे शेवटी सामाजिक न्याय भवन येथे या मतदार जागृती सायक्लोथॅानचे समापन होणार आहे.
या सायकल रॅलीमध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी तसेच महसूल, पोलीस, जिल्हा परिषद सायकल संघटनेचे सदस्य यासह लायन्स क्लब, रोटरी क्लब, महिला सायकल संघटनेचे सदस्य ही असणार आहेत.
जास्तीत जास्त मतदार नागरिकांनी या सायक्लोथॉनचा भाग होऊन मी मतदान करणार असा संदेश द्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
मुद्रित तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनीही या मतदान जागृती सायक्लोथॉनचा भाग व्हावा, असे अशी अपेक्षा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी व्यक्त केली आहे.