अतिदक्षता विभागात २५ बेड्स वाढवले
बीड प्रतिनिधी :- गंभीर आजार, दुखापतग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल आणखी सज्ज झाले आहे. येथील अतिदक्षता विभागात (ICU) आणखी २५ बेड्स वाढविण्यात आले असून गंभीर रूण्गांवर उपचार करण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळे जिल्हाभरातून उपचारासाठी येणार्या रूग्णांची चांगली सोय होणार आहे.
बीड तालुक्यासह जिल्हाभरातून काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल येथे गंभीर रूग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. अपघाताने दुखापत झालेले व गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांचे उपचार तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी काकू-नाना हॉस्पिटल हे विश्वसनीय ठिकाण आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून याठिकाणी रुग्ण मोठ्या संख्येने उपचारार्थ येतात. या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आता हॉस्पिटल व्यवस्थापनाने आणखी २५ बेड्स अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU मध्ये वाढवले आहेत. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढली तरी कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. तसेच आणखी क्षमतेने आणि चांगल्या पद्धतीने रूग्णांवर उपचार केले जातील असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल चे संचालक आ.संदीप क्षीरसागर यांनी वाढविण्यात आलेल्या बेड्स आणि यंत्रणेची पाहणी करून व्यवस्थापनाला विविध सुचना केल्या. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, अर्जून क्षीरसागर, हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी सय्यद बशीर, वैद्यकीय संचालक डॉ. विठ्ठल आळणे यांच्यासह हॉस्पिटल व्यवस्थापनातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.