उस्मानाबाद/प्रतिनिधी
सध्या चालू असलेली वीज बिल वसुली तात्काळ थांबून सदर वीजबिल रक्कम खरीप 2020 मध्ये नुकसान झालेल्या पिकांच्या मिळणाऱ्या पिक विमा रकमेतून भरणा करून घ्यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने महावितरण कंपनीचे उपअभियंता यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात अर्थकारण पूर्णत: शेतीवर व पर्यायाने पावसावर अवलंबून आहे. 2020 मध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेली अनुदान ही खूप थोडे होते. त्यानंतर पिक विमा मिळेल अशी अपेक्षा असताना हक्काच्या यापासून जिल्ह्यातील जवळपास ऐंशी शेतकरी आजही वंचित आहेत. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरूच आहे. सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबत दि.5 मार्च रोजी शासनाने पत्र काढले असले तरी प्रत्यक्षात अजून याबाबत कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी आणखीनच अडचणीत आहे. तसेच रब्बी हंगाम 2020 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे मराठवाड्यातील विविध भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हरभरा, ज्वारी, गहु व इतर पिक कांदा, द्राक्ष, आंबा, व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी काळी पडणे, भाऊ पांढरा पडणे, हरभऱ्याला मोड येणे तसेच द्राक्ष पिकाला अवकाळी पावसामुळे घर पडणे, मनी तडकने बुरशी निर्माण होणे तसेच आंब्याचा तौर गळून नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे चांगले उत्पन्न तयार झालेले असल्यामुळे व बाजारात यास योग्य भाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्याकडे म्हणावेसे पैसे शिल्लक राहिले नाहीत. शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महावितरण करून सरसकट वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे आदित्य आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्यांच्या उभ्या पिकांचे पाण्याअभावी प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. यात शेतात असलेल्या जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण कडुन 24 तास वीजपुरवठा दिला जात नाही. लोड शेडींग ठेवली जाते 8 तास वीजपुरवठा मिळतो आणि तो पण योग्य दाबाने मिळत नसल्यामुळे शेतीसाठी पाण्याचा पुरेसा वापर होत नाही. ट्रांसफार्मर जळाल्यानंतर एक एक महिना दुरुस्त करून दिली जात नाही त्यात देखील ते दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच स्वखर्चाने ने आण करावी लागते उभी पिके दोस्ती आणि भविष्यातही नुकसानाची सामना करावा लागेल म्हणून विजेची नितांत गरज असल्याने अनेक शेतकरी व्याजाने पैसे काढून वीजबिल भरत आहेत. दिनांक 5 मार्च 2020 कृषिमंत्र्यांनी कंपनीला पिक विमा देण्यासाठी सूचना करू असे आश्वासन दिले आणि तसे पत्रक काढल्याचे समजते. परंतु याबाबत अद्याप काहीच झाल्याचे दिसून येत नाही. कितव्या चे पैसे जमा झाले तरी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी एक प्रकारे मदतच होणार आहे. त्यामुळे आमची शासनाकडे मागणी आहे की आमच्या हक्काचा पीक विम्याच्या रकमेतून वीजबिल कपात करून घ्यावेत व विज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स. सदस्य वामन डावरे, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, ओबीसी मोर्चा माजी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, कमलाकर शिरसाट, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, व्यापार आघाडी सरचिटणीस बाळु माशाळकर, युवराज जाधव, गोविंद ढोणे, गणेश स्वामी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.