गजानन साखर कारखान्याच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम संपन्न
बीड प्रतिनिधी :- गणरायाच्या कृपेने व तमाम सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादाने गजानन साखर कारखाना गेल्यावर्षी पासून सुरू झाला आहे. हजारो शेतकरी बांधव या गाळप हंगामाने सुखावले जाणार आहेत. याचा मनस्वी आनंद असून, शेतकऱ्यांचा शेवटच्या ऊसाच्या कांडीचे गाळप करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी गजानन सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या मिल रोलर पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त केले.
बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचा आधार असलेला गजानन सहकारी साखर कारखाना २०१३ पासून बंद होता. आ.संदीप क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून व डी.व्ही.पी. कमोडीटी एक्सपोर्ट प्रा.लि. यांच्या सहकार्यातून गजानन कारखाना २०२२ मध्ये जोमात सुरू झाला. या माध्यमातून बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शुक्रवार (दि.८) रोजी सोनाजीनगर, राजुरी नवगण ता.बीड येथील डि.व्ही.पी. कमोडिटी प्रा.लि. संचलित गजानन साखर कारखाना गळीत हंगाम २०२३-२४ चा मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह महंत अमृतदास महाराज जोशी, अमरजी पाटील, मदन जाधव सर, वैजीनाथ नाना तांदळे, भारत झांबरे पाटील, डॉ.बाबुराव जोगदंड, अर्जुन क्षीरसागर, अशफाक इनामदार, सुहास शिंदे, चौघुले साहेब, बाळासाहेब बहीर, लिमकर साहेब, सावंत साहेब, तांबारे साहेब, संदीपान खारे साहेब इतर मान्यवर, कर्मचारी, शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.