Beed प्रतिनिधी: वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्या गेलेल्या तिर्थक्षेत्र अरण विकास प्रश्नाला सावता परिषदेने ऐरणीवर आणून वाचा फोडली असल्याचे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी म्हटले. श्रीक्षेत्र अरण येथे चंदनऊटी सोहळ्यानिमित्त आयोजित भक्त मेळ्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना श्री. आखाडे म्हणाले की, तिर्थक्षेत्र अरणच्या विकासाचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा सावता परिषदेने उचललेला असून सावता संदेश यात्रा काढून अरण प्रश्नाबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम हाती घेतले. अरण ते संभाजीनगर या सावता संदेश यात्रेसोबतच संघटनेचे मेळावे, अधिवेशने, मोर्चे, आंदोलने आदी माध्यमातून हा विषय सातत्याने लावून धरलेला आहे.
गर्दी नाही म्हणून विकास नाही आणि विकास नाही म्हणून गर्दी नाही या दुष्टचक्रात अरणचा विकास अडकला होता. म्हणूनच सावता परिषदेच्या वतीने अरण येथे वारंवार राज्यव्यापी मेळावे आयोजित करून लाखो भाविक समाज बांधवांची गर्दी जमविली. अरणच्या विकासासाठी सरकार दरबारी पाठपुरावा तर केलाच पण त्याच बरोबर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह तात्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, धनंजयराव मुंडे, पंकजाताई मुंडे, अतुल सावे, महादेवराव जानकर, दत्तात्रय भरणे आदी मंत्र्यांना निमंत्रित करून प्रत्यक्ष सरकारच अरण दरबारी आणले. यामाध्यमातून खिजगिणतीतच नसलेल्या अरण विकास प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्याचे महत्वाचे काम सावता परिषदेने केलेले आहे. सावता परिषदेमुळेच आम्ही अरणला गेलो, अरण बघितले असे असंख्य जन सांगतात, हिच खरी सावता परिषदेच्या कामाची पावती म्हणावी लागेल. अरणच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्याचे आम्ही स्वागत करू. कोणाच्याही प्रयत्नातून होवो पण अरणचा विकास झाला पाहिजे हि आपली प्रांजळ भूमिका आहे. मात्र केवळ आम्हाला विरोध करायचा म्हणून समाजात गैरसमज निर्माण करून चांगल्या कामात खोडा घालणे अत्यंत चुकीचे आहे. आपण असल्या अपप्रवत्तीला कदापि भीक घालणार नाही आणि समाज बांधवांनीही खोडळसांना थारा देता कामा नये. अरणचा विकास हा आमचा ध्यास असून सत्ता असो वा नसो अरणच्या विकासासाठी सावता परिषदेचे प्रयत्न अविरतपणे सुरू राहतील असे त्यांनी म्हटले.
याप्रसंगी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, रविकांत महाराज वसेकर, सावता महाराज वसेकर, दादा महाराज वसेकर, किर्तनकार दयाघन महाराज (पंढरपूर), भागवताचार्य संतोष महाराज शास्त्री (आळंदी), भजनसम्राट सदानंद महाराज मगर (पैठण) यांना निमंत्रित करण्यात आले होते.
सावता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मयुर वैद्य, प्रदेश महासचिव गणेश दळवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रविण गाडेकर, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश संघटक बापुराव धोंडे, शिवाजी येवारे, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. गोपाळ बुरबुरे, मराठवाडा अध्यक्ष शिवानंद झोरे, संपर्कप्रमुख विष्णूपंत खेत्रे, संघटक सौ.शारदाताई कोथंबिरे, पश्चिम महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष राहुल जावळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष मृदुल माळी, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, पुणे महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्निल कोद्रे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उद्धव भुजबळ, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, अहमदनगर जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, पिंपरी चिंचवड महानगर जिल्हाध्यक्ष चेतन वाघमारे, माढा तालुकाध्यक्ष डॉ.भारत कुबेर, पंढरपूर तालुकाध्यक्ष तुकाराम माळी, दादासाहेब चौधरी, जनार्धन बारवकर, परमेश्वर ढवळे, विजय जगताप, राहुल दुधे, बाबा वाघुले, अशोक हजारे, पोपट बनसोडे, भारत गोरे, प्रज्वल राऊत, अशोक कातखडे, डॉ. विलास राऊत, सौ.रोहिणी काळे, सौ.आशा गायकवाड, सौ.छाया पडसाळकर, मराठी हॉटस्पॉटचे संपादक शरद शिंदे आदी सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह समाज बांधवांची उपस्थिती होती.