मराठा समाजाकडून आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांचे आभार
अंबाजोगाई प्रतिनिधी:-मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला अंबाजोगाईतील कुणबी मराठा समाज स्मशानभूमीचा प्रश्न अखेर आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्यामुळे मार्गी लागला आहे. याबाबत अधिकृत माहिती ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी दिली आहे. याबद्दल कुणबी मराठा समाजाकडून आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांचे आभार मानण्यात येत आहेत.
याबाबत कुणबी मराठा समाजाचे युवा कार्यकर्ते अतुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून कुणबी मराठा समाज स्मशानभूमीचा प्रश्न प्रश्लंबित होता, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत कुणबी मराठा समाजातील बांधवांना उघड्या जागेवर अंत्यविधी करावा लागत होता, या बाबत कुणबी विकास मंचचे अध्यक्ष भास्करराव भिसे,कुणबी विकास मंचचे उपाध्यक्ष अरूणराव काळे,कुणबी परिवारातील सदस्य नागेश मस्के, संजय सुर्यवंशी,अतुल जाधव,रणजित डांगे, सचिन भिसे, भास्कर जगताप,गोपाळ मस्के,आकाश भिसे,धनंजय हावळे, श्रीकांत धायगुडे, वैजनाथ शिंदे, शिवराम ढेंगे,सुशीलकुमार मुकडे, रोहन कुरे, गोविंद जाधव, सुनिल शिनगारे आदींसह कुणबी मराठा समाज बांधव आम्ही सर्वजण मिळून केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी, युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा, माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम शेख रज्जाक, माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी यांना भेटून याप्रश्नी लक्ष देण्याची विनंती केली असता, या सर्व मान्यवरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आमदार सौ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी, युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांनी कुणबी मराठा समाजाला दिलेला शब्द खरा केला. याविषयी कुणबी मराठा समाजाचे पञकार अतुल जाधव यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुरावा केला. त्यामुळे अत्यंत आवश्यक असलेल्या कुणबी मराठा समाज स्मशानभूमीचा प्रश्न अखेर आमदार सौ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी, युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांनी शासन दरबारी वेळोवेळी हा प्रश्न मांडला आणि पाठपुरावा करून रेणुकामाता मंदिर रोड जवळील अंबाजोगाई येथील कुणबी मराठा समाजाच्या “स्मशानभूमी” साठी सर्व्हे नंबर 621/2 मधील 20 गुंठे जागा शासकीय गायरानातून उपलब्ध करून दिली. त्याबद्दल कुणबी मराठा समाजाकडून अतुल जाधव यांनी वरील सर्व मान्यवरांचे आणि तसेच प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत.