—स्पर्धा केल्यामुळे शासनाचे ७० कोटी वाचले
—जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेवर 1800 कोटी खर्च होणार
— कामे दर्जेदार होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांचे विशेष लक्ष
—सीईओंच्या कामाच्या गतीमुळे जलजीवनचे शंभर टक्के कामे पुर्ण होणार
—कामे दर्जेदार न झाल्यास गुत्तेदारांचे डिपाॅझेट जप्त होणार
— ग्रामस्थांनी कामे दर्जेदार करून घ्यावेत; काही तक्रारी असतील तर त्वरित जिल्हा परिषद कडे कराव्यात!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड जिल्हा हा मुळात दुष्काळी जिल्हा असल्यामुळे बीड जिल्ह्यात तीन-चार वर्षात दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यानंतर बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची मोठी कसरत असते परंतु आता भविष्यात ग्रामीण भागातील महिलांना या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कारण केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी पाणी देण्याचा संकल्प केंद्र शासनाचा आहे. यात बीड जिल्ह्यात 1367 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांपैकी 1139 गावांच्या वर्क ऑर्डर निघाले असून उर्वरितही वर्क ऑर्डर येणाऱ्या दहा ते बारा दिवसात निघणार आहे. या सर्व योजनेवर एकूण 1800 कोटी रुपये खर्च होणार असून ही कामे दर्जेदार होण्यासाठी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार व त्यांची टीम विशेष लक्ष ठेवून आहे. अजित पवार यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्यामध्ये जलजीवन योजना शंभर टक्के पूर्ण होत असून ही जिल्ह्यासाठी सकारात्मक बाब आहे. परंतु या योजनेत भ्रष्टाचार होणार नाही यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
बीड जिल्हा हा राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा विकासापासून मागे असलेला जिल्हा आहे. यामुळे बीड जिल्ह्यात अनेक समस्या उद्भवल्या आहेत. परंतु काही अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे बीड जिल्हा हा आता हळूहळू विकासाच्या प्रवाहात येत आहे. सध्या केंद्र शासनाच्या अंतर्गत जलजीवन मिशन योजना देशभरात राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील १३६७ गावे पाणीदार होणार आहेत. या गावांमध्ये ग्रामस्थांना भविष्यामध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. जलजीवन योजनेवर बीड जिल्ह्यात 1800 कोटी रुपयांचा निधी खर्च होत असून, ही सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जलजीवन योजना जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पूर्ण होत असून या योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात होत असलेली कामे दर्जेदार होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण की जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत, सध्या मोठ्या प्रमाणात जलजीवन चे कामे सुरू असून याचा निधी मोठा आहे. यामुळे यात मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो यामुळे नागरिकांनी सुद्धा दक्ष राहून कुठे काही कामे दर्जाहीन होत असतील तर तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून ते काम दर्जेदार करून घ्यावे याची जबाबदारी सुद्धा आता ग्रामस्थांवर आहे. तसेच अजित पवार यांनी सुद्धा ही सर्व कामे दर्जेदार करून घेण्यासाठी कामांना भेटी देण्याची गरज आहे.
दर्जेदार कामे न करणाऱ्या गुत्तेदारांचे डिपॉझिट जप्त होणार
बीड जिल्ह्यामध्ये जनजीवन मिशन योजनेवर मोठा निधी खर्च होत असून ही कामे जिल्ह्यातील अनेक गावात सुरू आहे जवळपास हि कामे शंभर टक्के पूर्ण होत असून ९५ कामांच्या वर्क ऑर्डर निघाले आहेत. आता ही कामे दर्जेदार करण्यासाठी गुत्तेदारांनी सुद्धा विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेक कामांमध्ये गुत्तेदारांनी थातूरमातूर कामे करून निधी लाटण्याचे काम केले होते. परंतु जलजीवन मध्ये तसे होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी गुत्तेदारांकडून ठराविक रक्कम डिपॉझिट करून घेतली आहे. यामुळे जर गुत्तेदारांनी कामे दर्जेदार केली नाही तर जमा केलेले डिपॉझिट जप्त केले जाईल अशी माहिती प्रारंभी बोलताना अजित पवार यांनी दिली.
जल जीवन योजनेचा बीड जिल्ह्याला मोठा फायदा होणार — अजित पवार
जल जीवन योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कामे होत असुन यातील ९५ टक्के कामे सुरु जालेली आहेत. उर्वरित कामे सुद्धा लवकरच सुरू होत असून ही सर्व कामे दर्जेदार करून घेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. गुत्तेदारांनी कामे दर्जेदार न केल्यास गुत्तेदारांकडून डिपाॅजेट स्वरुपात जमा केलेला निधी जप्त करणायात येईल. जलजीवनची कामे दर्जेदार करण्यासाठी आमची सर्व टीम कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करत आहे. तसेच ग्रामस्थांनी सुद्धा हि कामे दर्जेदार करुन घ्यावीत. अजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी बीड.