शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हि निवडणूक जड जाणार!मराठवाड्यातील शिक्षक काळेंवर प्रचंड नाराज
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे आमदार विक्रम काळे सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्याचा प्रचार दौरा करत आहेत. विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर न दिसणारे आमदार प्रचारासाठी दिसू लागले आहेत. यासह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे काळेंवर शिक्षकांमधून प्रचंड नाराजगी दिसून येत आहे. मुळात ज्या कामासाठी निवडून दिले तेच काम आमदार काळे विसरले. आमदार पद फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच का असा सुद्धा प्रश्न दबक्या आवाजात चर्चिला जात आहे. यामुळे ही निवडणूक प्रक्रिया काळेंना जड जाण्याची शक्यता दिसत आहे.
विनाअनुदानित शाळेच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष करणे, जुन्या पेन्शन योजनेवर शब्द सुद्धा न काढणे यासह शिक्षकांना भेटण्यासाठी वेळ न देणे यासह इतर बाबीमुळे आमदार विक्रम काळे यांच्यावर शिक्षक प्रचंड नाराज असल्याचे चित्र आहे. तसेच पक्षातील बंडखोरीमुळे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक आमदार काळेंसाठी जड जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे निवडणुकीचा प्रचार करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्या प्रचाराला शिक्षकांकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. आमदार काळे यांनी आमदारकीचा फायदा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला अशी सुद्धा चर्चा आहे. यामुळे ह्या निवडणूकीत शिक्षक कोणाला सपंती देणार हे पाहावे लागणार आहे.
मराठवाड्यातील शिक्षक आमदार काळे यांना स्वीकारणार का?
राज्याच्या इतर विभागाच्या तुलनेत मराठवाडा विभागात विकासापासून मागे असलेल्या विभाग आहे. यामुळे या विभागातील शिक्षकांचे सुद्धा अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. सलग दोन वेळा शिक्षकांच्या जीवावर आमदार होणारे आमदार विक्रम काळे शिक्षकांच्या प्रश्नाकडेच दुर्लक्ष करत असल्यामुळे तिसऱ्यांदा आमदार विक्रम काळे यांना मराठवाड्यातील शिक्षक स्वीकारणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.