बीड प्रतिनीधी :- ADFC चषक मुळे क्रिकेट मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या नवतरुणांना संधी उपलब्ध होत आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तात्या तांदळे यांनी व्यक्त केले.आजच्या क्रिकेट मॅचचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बीड येथे सुरू असलेल्या ADFC चषक च्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रंसगी ॲड.तांदळे यांनी मत व्यक्त केले.शिवसेना नेते अनिल दादा जगताप यांच्या मार्गदर्शानाखाली सुरू असलेल्या ADFC चषक क्रिकेट सामन्यात आज कडा-आष्टी संघ विरुद्ध बीड जिमखाना असा सामना रंगला अतिशय अटीतटीच्या सामन्यात बीड जिमखाना ने मॅच जिंकला.या मॅच च्या बक्षीस वितरणवेळी ॲड.तांदळे यांनी अनिल दादा जगताप यांच्या जुन्या क्रिकेट खेळाच्या आठवणींना उजाळा दिला.अनिल दादा यांनी भगवान युवक क्रीडा मंडळ,बीड जिमखाना आणि आदर्श क्रिकेट क्लब.अश्या विविध माध्यमातून चांगले खेळाडू तयार केले.आज जी ADFC चषक च्या माध्यमातून नवीन आणि ज्यांच्यात क्रिकेट खेळाचे उत्कृष्ट गुण आहेत अश्या नवोदित खेळाडूंना नक्कीच यश मिळेल.आज ची तरुण पिढी ही मोबाईल च्या विळाख्यात सापडत चालली आहे. मैदानी खेळापासून तरुण पिढी बाजूला सरकत आहे. अश्या स्पर्धेमुळे तरुण पिढी मैदानाकडे परत येऊ शकते. ही काळाची गरज आहे कारण मैदानी खेळामुळे तरुणांचा व्यायाम होतो शरीर निरोगी राहते आणि तरुण पिढी व्यसनाकडे वळत नाही. ADFC चषक चे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण स्पर्धा नॅशनल लेवल च्या स्पर्धेप्रमाणे होत आहे. अतिशय उत्तम नियोजन, पूर्ण मॅच थेट प्रक्षेपणाद्वारे उपलब्ध होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भर या मॅचचे थेट प्रक्षेपण उपलब्ध होत आहे.सुंदर आणि मनोरंजक अश्या क्रिकेट कॉमेट्री चे पण नियोजन केले आहे.खेळाडूंचे मनोबल वाढण्याकरिता भरपूर प्रमाणत बक्षीस ठेवण्यात आले आहेत.जसे की मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अशे अनेक बक्षीस आहेत. ADFC चषक चे पूर्ण नियोजन अनिल दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर जी जगताप,अजय जाधव,संजय धस,राजेश आघाव व दादांची सर्व टीम यात जीव ओतून काम करीत आहे.ह्या चषकामुळे बीड वासियांना चांगल्या क्रिकेट मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे.आजच्या झालेल्या मॅच मध्ये विजेत्या संघास ॲड.तात्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.यावेळेस ADFC चषक ची सर्व टीम आणि ओमकार उबाळे,अमर सानप,विशाल खाडे,सचिन तिपटे,समर्थ तांदळे,मुन्ना शेख,डांगे साहेब आदी मित्र परिवार आणि क्रिकेट रसिक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड वासियानी होत असलेल्या क्रिकेट मॅचेस चा आनंद घ्यावा आणि 22 जानेवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचा लाभ घ्यावा असे आवहान पण ॲड.सर्जेराव तात्या तांदळे यांनी केले आहे.