बीड :– लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांनी उदात्त भावनेतून व्यसनमुक्तीची चळवळ आरंभली.कोणताही तरुण व्यसनाधिनतेकडे “न ” जाता चांगल्या आरोग्याचा संकल्प करून नवीन वर्षाचे स्वागत करावे यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे सुरू केलेली व्यसनमुक्तीची ही चळवळ याही वर्षी चालू आहे व पुढे अविरतपणे चालू राहील. याचाच एक भाग म्हणून कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान व मेटे परिवार आयोजित व्यसनमुक्ती महारॅलीचे आयोजन 31 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 7.30 वाजता होत आहे. ही रॅली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.
या रॅलीमध्ये बीड शहरातील व परिसरातील सुज्ञ नागरिक, विद्यार्थी, पालक यांनी या सहभागी होत सशक्त भारत घडवण्याचा संकल्प करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तसेच ऐतिहासिक रॅलीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांच्या वतीने करण्यात येत आहे.