बीड प्रतिनिधी : राजुरी नवगण आणि या मतदार संघातील प्रमुख माताभगिणी आणि युवक माझ्या खांद्याला खांदा लावून पक्ष कार्यकरत असून स्व.काकू-नाना, स्व.रेखाताई यांच्या विचाराचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलमधील सर्व उमेदवार नवगण गजाननाच्या आशिर्वादाने विजयी होणार असून या निवडणुकीच्या माध्यमातूून राजुरी नवगण आणि बीड मतदार संघाला विकासाची एक नवी दिशा मिळणार आहे असे वक्तव्य आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी नवगण राजुरी येथील ग्रामपंचायतच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी प्रथम गावातुन हजारो नागरिकांनी भव्य रॅली काढून आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या शुभहस्ते नवगण गजाननाच्या मंदिरात जावून दर्शन घेवून आणि नारळ फोडुन नवगणाच्या साक्षीने प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रसंगी बोलतांनी आ.संदीप भैय्या म्हणाले की, नवगण राजुरी हे सर्कल स्व.काकू-नानांची कर्मभुमी असून येथील ग्रामस्थांनी गेल्या कित्येक दशकापासुन रविंद्र दादा क्षीरसागर, स्व.रेखाताई क्षीरसागर व माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहुन या सर्कलचे जि.प.सदस्य म्हणून सभागृहात पाठविण्याचे काम केले असून संकटाच्या काळी पोटच्या पोरासारखे जपण्याचे काम येथील ग्रामस्थांनी केले आहे. मी आणि माझा परिवार कायम ॠणी असून येणार्या काळात राजुरी नवगण ही ग्रामपंचायत विकासाचे नवे मॉडेल ठरणार असून बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात एक नंबरची ग्रामपंचायत म्हणुन नावलौकीक मिळविणार आहे. मला विश्वास आहे की, येथील मतदार आणि नागरिक नवगण गजाननाच्या आशिर्वादाने विरोधकाला भुईसपाट करून सरपंच पदाचे उमेदवार सौ.मंजुषा सुनील बनकर, व सदस्य पदाचे उमेदवार सौ.सुदामती किसन बहिर, सौ.कालींदाबाई दिलीप गवळी, सौ.संगिता अभिमन्यु जमदाडे, सौ.मुक्ताबाई बबन गावडे,सौ.गिता रविंद्र बहिर, सौ.बयाणाबाई रमेश ससाने, श्री.शशिकांत लाला पवार, श्री.टुल्ले विकास महादेव, श्री.अजय होनाची गायकवाड, श्री.ज्ञानेश्वर भीमराव बहिर, श्री.बहिर अंकुश विशाल, श्री.बहिर भगवान आत्माराम भरघोस मताने विजयी करतील यात दुमत नाही.