अजिंक्य चांदणे : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून राज्यात अनोखे आंदोलन
बीड / प्रतिनिधी : भाजपच्या वाचाळखोर नेत्यांनी देशात आणि राज्यात हैदोस मांडून सामाजिक सलोख्याला गालबोट लावले आहे. भाजप आणि आरएसएस काही नेत्यांना जाणीवपूर्वक आक्षेपार्ह वक्तव्य ठरवून देतात. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी पैठणच्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाणे बीडमध्ये रविवार (दि.११) रोजी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून वराहाच्या गळ्यात चंद्रकांत पाटील यांचा फोटो अडकवून तीव्र घोषणा देत आंदोलन करण्यात आले. डीपीआयचे प्रदेशाध्य्क्ष अजिंक्य चांदणे यांनी सदरील आंदोलन करुन चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बीड शहरताही अण्णाभाऊ साठे चौक येथे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून रविवार (दि.११) रोजी डीपीआयचे प्रदेशाध्य्क्ष अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.आंदोलन कर्त्यांनी एका वराहाच्या गळ्यात वाचाळ वीर चंद्रकांत पाटील यांचा फोटो लटकवून राज्यात वेगळे आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा.या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलेल्या कार्यर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. आदी मागण्या आंदोलन कर्त्यांनी केल्या आहेत.
निवेदनात म्हंटले आहे की,देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून सामाजिक सलोखा पूर्णतः ढासळला आहे. भाजप पक्षातली काही माणसे बेलगामपणे वक्तव्य करु लागली आहेत. येणाऱ्या काळात केवळ आणि केवळ भाजपपासून देशाला धोका निर्माण होण्याचे संकेत दिसून येत आहेत. माणसामाणसात, जातीजातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करुन सामाजिक वातावरण जाणीवपूर्वक बाधित केले जात आहे. निषेधार्थ वक्तव्य आणि दंगली पेटविणाऱ्या भाजप लोकांना मोकाट सोडले जात आहे, आणि लोकशाही मार्गाने निषेध नोंदविणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. ही बाब एकाधिकार शाहीची असून देशाला बाधक आहे. असे म्हणत चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध नोंदवला. दरम्यान राम कदम यांचा देखील यावेळी निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात सुभाष लोणके, उत्तम पवार, भारत कानडे, केशव लोंढे, बाळासाहेब पौळ, अमोल सुतार, योगेश लोंढे, सतिष चांदणे, आनंद चांदणे, विजय चांदणे, अविनाश पाटोळे, अशोक वाघमारे, योगेश वाघमारे,अभिमान पाटोळे, नितीन पाटोळे, प्रविण चांदणे, बाळासाहेब दोडके, विशाल चांदणे, संतोष ससाणे, नामदेव भिसे, रतन कांबळे, रवी कांबळे यांच्यासह आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.