बीड जिल्ह्य़ातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तसेच संघटना यांच्या तकारी,आंदोलनानंतर कोट्यावधी रूपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात चौकशी सुरू असतानाच दि.०७ डिसेंबर रोजी रात्री बीड जिल्हापरिषद ग्रामिण पाणीपुरवठा विभाग कार्यालयाला लागलेल्या आगीत महत्वाची कागदपत्रे जळुन खाक झाल्याची घटना संशयास्पद असुन संबधित प्रकरणात जबाबदार जिल्हापरिषद विभागातील वरिष्ठ आधिकारी,कर्मचारी,ठेकेदार यांचाच हात असुन संबधित प्रकरणाची (S.I.T.)उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री,प्रधान सचिव,स्वच्छता व ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री,विभागीय आयुक्त यांना ईमेल द्वारे केली आहे.
जिल्हापरिषदेतील वरिष्ठ आधिकारी,कर्मचारी आणि ठेकेदारांचे संगनमतानेच प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न
__
बीड जिल्ह्य़ातील कोट्यावधी रूपयांच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणात जिल्हापरिषद मधील वरिष्ठ आधिकारी मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार,तत्कालीन प्रकल्प संचालक प्रदिप काकडे तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा नामदेव उबाळे आणि जिल्हापरिषद मधिल कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक व कंत्राटदार व स्थानिक राजकीय पुढारी यांनी संगनमतानेच अपहार केला असून संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी.एकंदरीतच पुरावे नष्ट करून प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न आहे.