Beed : बीड नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांना नगररोड वरील च-हाच्या,पानाच्या टप-या हातगाडीवाले यांना अतिक्रमणाच्या नावाखाली जेसीबीने ऐन दिवाळीच्या तोंडावर संसार उद्ध्वस्त केले मात्र याच विभागांना राजकीय नेते,पुढा-यांचे छत्रपती शिवाजीमहाराज चौक तसेच विश्रामगृहाला वेढलेल्या अनाधिकृत होर्डिग्ज मुळे वाहतुकीस अडथळा तसेच होणा-या संभाव्य अपघातांचे गांभीर्य दिसून येत नाही. तरी हे बॅनर काढण्यात यावेत अशी मागणी समाजसेवक गणेश ढवळे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला नेहमीप्रमाणेच नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली
बीड शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौक व विविध शासकीय कार्यालय आणि डीव्हाडर व विश्रामगृहासमोरील विविध पक्ष संघटना,राजकीय नेते यांच्या अनाधिकृत होर्डिग्ज मुळे वाहतुकीस अडथळा व संभाव्य अपघात यामुळे होर्डिग्ज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी दि.२३ ऑगस्ट रोजी निवेदन दिल्यानंतर त्या अनुषंगानेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड व मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांना संबधित प्रकरणात कारवाईचे आदेश देऊन सुद्धा अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसून एकंदरीतच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला नेहमीप्रमाणेच केराची टोपली दाखवली आहे.