महर्षी गौतमऋषी देवस्थान कार्तिकी काकडआरती सांगता संपन्न
बीड प्रतिनिधी : वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकर्यासाठी कार्तिकी भजन काकडा आरती परंपरा महत्वाची मानली जाते. वारकरी संप्रदायातील भक्तगण अश्विनी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा अखंड महिनाभर पहाटे चार ते सकाळी सात वाजेपर्यंत काकडा भजन आरती नित्यनियमाने साजरी करतात.
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र परम पूजनीय बंकटस्वामी महाराज यांनी आळंदी येथे काकडा आरतीची परपंरा सुरु केली. तीच परंपरा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात श्रद्धा पूर्वक राबवली जाते. अगदी पहाटेच्या प्रहरी पांडुरंगाचे गुणगान अभंगाच्या माध्यमातून भक्तिभावाने गायले जाते. यामुळे परिसरात सात्विक वातावरण निर्माण होतेच, शिवाय सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे हृदय भाव भक्तीने समृद्ध होते. बंकटस्वामी महाराजांनी भक्तिमार्गाची रोवलेली ही मुहर्तमेढ हि अध्यात्मिक क्षेत्रात आजही महत्वाची ठरलेली आहे. लाखो वारकऱ्यांचा श्रद्धेतून भक्तिमार्गाचा हा यज्ञ अखंडपणे चालत राहणार आहे. असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला.
आज पालवण येथील महर्षी गौतमऋषी देवस्थान येथील भजन काकडा आरती सांगता समारोप उत्साहपूर्ण वातावरणात व हाजारो भाविकांच्या साक्षीने देवस्थानचे महंत श्रीरंग महाराज डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी अरुण नाना डाके, भीमराव मस्के, सखाराम मस्के, मातकर सर, श्रीकांत नाना, कांता नाना मस्के, अशोक सुखवसे, लालासाहेब पन्हाळे, विलास महाराज घोलप, सुरेश पांचाळ, शिवाजी लिंबाळकर, शिवाजी घोलप, भागवत घोलप, जयराम सातपुते, तुकाराम जटाळ, भागवत मस्के, भागवत घोलप, अरुण वाकोरे, बद्रीनाथ जटाळ, अर्जुन चित्रे, दादासाहेब जटाळ, देशमुख महाराज उद्धव मस्के, चंद्रकांत दरेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
मागील तीन वर्षापासून काकडा आरतीची परंपरा येथे सुरू आहे. पालवण पंचक्रोशीतील भाविकभक्तांनी प्रचंड प्रतिसाद दिला. काकड आरतीला अश्विनी पौर्णिमेपासून सुरु झालेल्या काकडा आरतीस दररोज चारशे ते पाचशे भाविक पाहते चार ते सात वाजेपर्यंत या कार्यक्रमात सहभागी होतात. पालवण पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व भाविक भक्तांना भोजनाची व्यवस्था केली जाते. संदीप भास्करराव मस्के यांनी आजच्या महाप्रसादाचे व्यवस्था केली होती. या सांगता प्रसंगी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.