समारंभ : पप्पू कागदे यांनी केला यथोचित सन्मान
बीड / प्रतिनिधी
कोणतीही चळवळ संघटनात्मक उभा करण्यासाठी त्या चळवळीला एक जागा लागते. कारण तेथूनच बांधणी आणि नियोजनात्मक काम उभा राहत असते.असे विचार राज्याचे सहकार मंत्री तथा बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री अतुल सावे सोमवार दि.7 रोजी बीडला आले असता त्यांनी रिपाइंच्या बीड मध्यवर्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी पालकमंत्री अतुल सावे यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व एक लढवय्ये नेतृत्व आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रिपाइं पक्ष वाढविण्याचे काम करत आहात.अनेक न्यायिक लढे रिपाइंने उभा केलेले आहेत.पप्पू कागदे यांच्याकडे संघटन उभा करण्याची ताकद असून ते संघटन जोडून ठेवण्याची क्षमता देखील आहे.बीड रिपाइंचे नविन कार्यालय सुविधायुक्त असून येणाऱ्या काळात अनेक लढे आणि आंदोलने या कसर्यालयातून उभा राहतील. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आपल्या शुभेच्छा असल्याचे मत पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अक्षय मुंदडा,राजू जोगदंड,किसन तांगडे, अविनाश जावळे,अरुण भालेराव, अविनाश जोगदंड, महेश आठवले, सुभाष तांगडे, नागेश शिंदे, विलास जोगदंड, धम्मा पारवे,प्रा.बाळासाहेब गव्हाणे, भैय्या मस्के, मिलिंद पोटभरे, गणेश वाघमारे, दिपक अरुण, अप्पा मिसळे, पप्पू वाघमारे, डॉ.अक्षय कांबळे , भाऊसाहेब दळवी, सोनू वडमारे, गौतम कांबळे,भाऊसाहेब कांबळे,वैभव सोनवणे,प्रा.डॉ.सिद्धार्थ वाघमारे,प्रकाश वडमारे, कपिल इनकर,शाम वीर आदी उपस्थित होते.