बीड प्रतिनिधी : जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री
अतुल सावे यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. श्री.
सावे यांनी अतिदक्षता विभागातील काम तसेच अंतर्गत व बाह्य
स्वच्छतेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन जिल्हा
शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे व सर्व अधिकारी तसेच स्टाफचे
अभिनंदन केले.
पालकमंत्री अतुल सावे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी
जिल्हा दौऱ्यावर आले होते. राष्ट्रीय एकता दौड संपल्यानंतर त्यांनी
जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश
साबळे यांनी श्री. सावे यांना येथील अंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवा
तसेच विविध शस्त्रक्रीया व कामांबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी
अजित पवार, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अक्षय मुंदडा आदी सोबत हो. अतुल सावे यांनी अतिदक्षता विभागाची पाहणी
करताना आरोग्य सुविधा व चांगल्या उपचाराबद्दल समाधान व्यक्त केले.
गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार द्या अशा सुचना देत येथील उपकरणे व विविध कामांसाठी शासन स्तरावरुन मदत केली जाईल, असेही अतुल सावे यांनी सांगीतले.