गेवराई प्रतिनिधी : माजीमंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त रेवकी नागरी सहकारी बॅंक व विघ्नेश्वर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रेवकी येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी जि.प. सदस्य फुलचंद बोरकर, रेवकी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन विलास देवकते, गोकुळ चोरमले,
डॉ. नरोटे, डॉ. ठवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना फुलचंद बोरकर म्हणाले की,
माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित हे राजकीय सामाजिक कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रेवकी देवकी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत समाजोपयोगी असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. शेवटच्या रुग्णापर्यंत उपचार करुन हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आमची आरोग्य यंत्रणा काम करेल. या मोफत शिबीरामुळे रेवकी देवकी गावातील गोर-गरीब रुग्णांची मोठी सोय झाली आहे.
शिबीराला रेवकी गावांत रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी कचरू बाबरे, बबन टेहळे, संजय सजगने, गजानन खताळ, विठ्ठल बाबरे, अशोक खताळ, बाळू चोरमले, अशोक कोळेकर, बाळू देवकते, बंडू शिंदे, भारत कोळेकर, आबा थोरात, भारत थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रेवकी देवकी आणि विठ्ठलनगर गावातील नागरिक उपस्थित होते. शिबिराचे सुत्रसंचलन प्रा.शरद सदाफुले यांनी तर आभार कमळाजी यमगर यांनी मानले.

















