या शिबीराचा लाभ घ्यावा – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : महाराष्ट्र शासानाच्या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित“ हया अभियानाच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. 23) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. हे अभियानाची सुरुवात दिनांक 26.09.2022 रोजी भव्य दंतरोग चिकित्सा शिबीराने होणार आहे. तरी शिबीराचा लाभ जास्त प्रमाणात घ्यावा असे आवाहन डॉ. सुरेश साबळे यांनी केले.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियाना अंतर्गत 26 ते 30 सप्टेंबर पर्यंत दंतरोग चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत बीड, केज, परळी, माजलगाव व गेवराई या ठिकाणी सुध्दा दंत रोग चिकित्सा शिबीराचे आयोजन केलेले आहे. हे दंतरोग तज्ञ चिकित्सा मार्फत दातांच्या सर्व आजारावरील तपासण्या, एक्स-रे, किडलेल्या दातामध्ये सिमेंट भरणे, हिरडयांचे आजार, रुटकॅनल ट्रिटमेन्ट, टूथ एक्सट्रॅक्शन, स्केलींग आदी विविध आजारावर उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीरात रुग्णांना चहापाणी, नाष्टा, जेवनाची सोय करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक विषयाचा तज्ञ डॉक्टर मधुमेहतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, भूलतज्ञ, अस्थीरोग तज्ञ हे उपस्थीत राहून रुग्णांना तपासून त्यावर दुस-या दिवशी उपचार व शस्त्रक्रिया करणार आहेत. शालेय तपासणी अंतर्गत निवडलेल्या बालकांवर ही उपचार केले जाणार आहेत. तरी या शिबीरामध्ये सर्व सुविधा उपचार मोफत केले जाणार असून रुग्णांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे अहवान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ.हुबेकर अशोक, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शहाणे, निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.सं) डॉ.राम आवाड यांनी केले आहे.