सायबर सेल विभागाची कौतुकास्पद कामगिरी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : माजलगाव तालुक्यातील एका व्यक्तीचे ऑनलाईन फसवणूकीत तीन लाखाची रक्कम लंपास झाली होती. यानंतर बीड सायबर सेलने तातडीने यंत्रणा कामाला लावत ऑनलाईन गेलेले तीन लाख रुपये परत आणून संबंधित व्यक्तीला परत केले. वेळेत यंत्रणा कामाला लावण्यामुळे ऑनलाईन मध्ये गेलेले तीन लाख रुपये परत मिळाले.
माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील अनिल कोळेकर यांची 25/08/2022 रोजी ऑनलाईन तीन लाखाची फसवणूक झाली होती. यांनतर त्यांनी तात्काळ बीड सायबर विभागाशी संपर्क साधला. यानंतर सायबर विभागाने तातडीने यंत्रणा कामाला लावून सायबर पोलीस स्टेशन बीड येथुन सर्व नोडल ऑफीस व बँकेचे मॅनेजर यांना मेल करुन सदर रकम फ्रिझ करणे बाबत कळवीले, त्यावरुन सदर तक्रारदार यांची फसवणुक करुन लंपास केलेले पैसे कुठे गेले आहेत याची माहिती मिळाली यानंतर सायबर पोलीस स्टेशन येथुन सर्व तांत्रीक योग्य कार्यवाही करुन गेलेले पैसे परत आणले व संबंधित यांना परत केले. सदर कामगीरी मा. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली
पोउपनि जाधव, सायबर पोलीस स्टेशन, बीड यांनी केली आहे.