बीड प्रतिनिधी – शहरात दोन अडीच वर्षात कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे मानवी जीवन अस्ताव्यस्त झाले होते. तरुणाईला आपला उत्साह दाखवण्यासाठी जागा उरली नव्हती. अशातच दहीहंडी, वेगवेगळे जयंती उत्सव, सणउत्सव, यावर विरजण पडले होते. मात्र सपना चौधरी च्या येण्याने बीडकरांच्या तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला असे उद्गार योगेश पर्वाचे उद्गाते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी काढले ते दीपज्योत ग्रुप सनी शाम आठवले मित्र मंडळातर्फे आयोजित दहीहंडी च्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मनीष क्षीरसागर, सनी आठवले, भगीरथ बियाणी यांच्यासह तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते.पुढे बोलताना डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, सपना चौधरी ह्या लहानपणापासूनच भोजपुरी गाण्यामुळे देशात आणि जगात प्रसिद्ध झाल्या . त्यांच्या बीडमध्ये येण्याने तरूणाईचा उत्साह शिगेला पोहोचला.असेही ते म्हणाले. सपना चौधरींचे स्वागत तरुणाईने टाळ्याच्या गजरात केले .
यावेळी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता सपना चौधरीच्या येण्याने बीडच्या तरुणाईच्या उत्साहात भर पडली होती. आणि आपल्या जागेवरच तरुण ठेका धरत होते. यावेळी बीड शहरातील तरुण-तरूणी, नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसंग्रम पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ.स्व. विनायकराव मेटे यांना दहीहंडी उत्सव कार्यक्रमात दोन मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्व तरुणांनी मेटे साहेब अमर रहे च्या घोषणा दिल्या.