नागरिकांनी या राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावे – राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाद्वारे साजरा होत आहे. देश भरातील नागरिक या राष्ट्रीय उत्सवात उत्स्फूर्त पणे सहभागी होऊन देशाप्रती आदराची भावना व्यक्त करत आहेत. त्याग आणि समर्पित भावनेतून मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्व युवा पिढीला कळाले पाहिजे. राष्ट्रप्रेमाची भावना लोकमनात रुजवण्यासाठी अमृत महोत्सवी वर्ष हर्ष उल्हासात साजरे होत आहे. या अनुषंगाने उद्या बीड शहरामध्ये जिल्ह्याच्यालोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत 75 मीटर लांबीच्या आकर्षक तिरंग्यासह भव्य तिरंगा रॅली निघणार आहे. शहरातील सुजाण नागरिकांनी तिरंगा रॅलीत बहुसंखेने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
तिरंगा रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – माळीवेस – धोंडापुरा – बलभीमचौक – राजुरी वेस –छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सामाजिक सभागृह नगर रोड बीड येथे राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप होईल.
रॅलीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रॅलीच्या अग्रभागी तिरंगा रथ, निवृत्त लष्करी अधिकारी, प्रतीकात्मक महापुरुषांचे पथक, शालेय विद्यार्थ्यांचे पथक, एन सी सी स्काऊट पथक, महिला विद्यार्थिनी थक, 75 मीटर तिरंगा ध्वज पथक, विविध संघटना पदाधिकारी मान्यवरांचे पथक, सर्व धर्मीय धर्मगुरुजन, शहरातील महिला पथक आणि सर्वात शेवटी खा.डॉ.प्रितमताई मुंडे या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.
सदरील तिरंगा रॅलीत निघण्यापूर्वी सकाळी 8.30 वा. संघर्ष योद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय नगर रोड बीड येथे खा. प्रितमताई यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण होईल. व तिरंगा झेंडा विक्री केंद्रांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी राष्ट्रीय पोशाख घालावा. तिरंगा यात्रा अगदी वेळेवर सुरु होणार असल्याने, पदाधिकारी व राष्ट्र प्रेमी नागरिकांनी वेळेवर बहुसंखेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात केले आहे.