बीड : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध शासकीय विभागांनी अनेक उपक्रम राबवले. विविध तालुक्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांनी हर घर तिरंगा मोहिम घरा घरात पोहचविण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग उत्साह वाढवणारा होता.
आष्टी शहरात उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, त्रिदल आजी – माजी सैनिक संघटना, सर्व कार्यालये, शैक्षणिक संस्था, नागरिक, पत्रकार यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी तिरंगा कार्यक्रमांतर्गत 75 फूट भव्य ध्वजाचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, युवक, नागरीकांचा उत्साह मोठा होता. याप्रसंगी मोटर सायकल रॅली काढण्यात आली.
पाटोदा तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव लोगो असलेले बॅजेस वाटप करण्यात आले. तर पंचायत समिती, माजलगाव येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
शिरूर कासार तालुक्यात गावोगावी राष्ट्रध्वज वितरण व माहिती पत्रिका वाटप करण्यात आले.
परळी तालुक्यातील ग्रामपंचायत वडगाव दा. यांच्यामार्फत घरोघरी तिरंगा उपक्रमाची जनजागृती रॅली काढण्यात आली.
अंजनडोह ता. धारूर, अंबाजोगाई तालुक्यातील सर्व केडरमध्ये येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत राष्ट्रध्वज अनावरण करून जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत कोतन,
तहसील कार्यालय, पाटोदा येथे कार्यालय इमारतीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच स्वच्छता मोहिमेसह पाटोदा येथे जनजागृती करण्यात आली. तर वडवणी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आझादी का अमृतमहोत्सवचा लोगो रंगविण्यात आला.
पोलीस ठाणे नेकनूरच्या वतीने मौजे येळंब घाट येथील बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक व घरोघरी तिरंगा मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
बीड पोलीस मुख्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शन व बँड शो आयोजित करण्यात आला आहे. त्याला विद्यार्थी व नागरीकांनी भेट देऊन माहिती घेण्यासाठी गर्दी केली.
आगरनांदूर ता.गेवराई येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत जनजागृतीपर घोषणा देत रॅली काढण्यात आली. यावेळी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.